अभिनेता गौरव चोपडाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. गौरव आणि त्याची पत्नी हिताशा यांच्या जीवनात नव्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. दोघांच्या जीवनात एक बाळ आलं आहे. खुद्द गौरवनेच सोशल मीडियाद्वारे खूशखबर त्याच्या फॅन्सना दिली आहे. नव्या पाहुण्याच्या आगमनानंतर आणि पिता झाल्याच्या भावनेने गौरव फारच भावुक झाला आहे. पत्नी हित्शाने मुलाला जन्म दिला आहे. आपण आपल्या जीवनात खूश असल्याचेही त्याने म्हटलं आहे. जीवनात बाळाचं आगमन झाले आहे, जीवापाड प्रेम करणारी पत्नी आहे.

मध्यंतरी गौरवर दुःखाचे डोंगर कोसळले होते. आई-वडिलांच्या निधनानंतर गौरव खूप निराश होता. गौरवच्या लग्नाला दोन वर्ष झाली आहेत. दोन वर्षानंतर त्यांच्या घरात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. गेले काही दिवस गौरवसाठी खूप कठिण होते. त्यांच्या आई वडिलांच्या निधनाच्या दुःखाचे डोंगर त्याच्यावर कोसळले होते. त्यातून सावरणे गौरवला कठिण जात होते. शेवटी चिमुकल्याच्या येण्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा आनंद त्याने चाहत्यांसह शेअर केला आहे. गौरवची पत्नी हिताशा बेंगलोरमध्ये आहे. तिथेच तिने बाळाला जन्म दिला आहे.

 

फेब्रुवारी २०१८ मध्ये गौरवने गुपचूप हिताशासह लग्न केले होते. कोणालाही कानोकानही या लग्नाची खबर लागू दिली नव्हती. या दोघांचे लग्न दिल्लीमध्ये पार पडले होते. गौरव टीव्ही इंडस्ट्रीचा एक मोठा स्टार आहे आणि त्याने आपल्या लग्नात कुठल्याच सेलिब्रेटीला आमंत्रण दिलं नव्हतं. 'बिग बॉस १०' मध्ये सहभागी झालेला अभिनेता करण मेहरा आणि त्याची पत्नी निशा रावल या दोघांनी लग्नाला उपस्थिती लावली होती.

लग्नसोहळा पार पडल्यानंतर स्वत: गौरव चौप्राने आपल्या लग्नाचा माहिती एका पोस्टद्वारे दिली आहे. गौरव चोप्राने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत गौरव शेरवानीत दिसत आहे. ही पोस्ट करताना गौरवने चाहत्यांना म्हटलंय की, 'तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असाच राहू द्या.'

गौरव चोप्रा सिरियल 'उत्तरन', 'साडा हक' आणि 'ऐसा देस है मेरा' सारख्या टीव्ही सिरियल्समध्ये पहायला मिळाला होता. गौरव चोप्रा बिग बॉसच्या घरातही स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Good News ! Actor Gaurav Chopraa and wife Hitisha welcome a baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.