'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2020 02:04 PM2020-10-10T14:04:45+5:302020-10-10T14:04:55+5:30

'रात्रीस खेळ चाले 2' मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.

Glamours entry by shevanta in serial promo 'tujha majha jamtay' | 'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक

'तुझं माझं जमतंय'च्या प्रोमोमध्ये शेवंता उर्फ अपूर्वा नेमळेकरच्या ग्लॅमरस तडका, चाहते झाले उत्सुक

googlenewsNext

'रात्रीस खेळ चाले 2' मालिकेने काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे.या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखेला प्रेक्षकांची पसंती मिळाली. मात्र शेवंता या व्यक्तिरेखेने महाराष्ट्रातील प्रेक्षकांना अक्षरक्षः वेड लावले होते. मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी आजही त्यातील पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर कायम केले आहे. झी युवावरील  'तुझं माझं जमतंय' या विनोदी मालिकेत  प्रेक्षकांची लाडकी शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर पम्मी या वेगळ्या व्यक्तिरेखेत दिसणार आहे आणि तिच्या सोबतच अभिनेता रोशन विचारे आणि अभिनेत्री आसावरी भरती भानुदास या मालिकेत प्रमुख भूमिका निभावणार आहेत. या मालिकेचा भन्नाट प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला, ज्यात पम्मीची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आणि हि पम्मी देखील आता प्रेक्षकांना तिच्या ग्लॅमरने घायाळ करणार यात शंकाच नाही. आता हि पम्मी शुभंकर आणि अश्विनी यांना तिच्या तालावर नाचवणार कि काय असा प्रश्न प्रेक्षकांना प्रोमो पाहून पडला आहे. या प्रोमोला प्रेक्षक आणि चाहत्यांचा उदंड प्रतिसाद मिळतोय. अपूर्वाच्या टेलिव्हिजनवरील पुनरागमनामुळे चाहते सुखावले आहेत.  

या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर म्हणाली, "रात्रीस खेळ चाले हि मालिका खूप गाजली. लोकांनी शेवंता या व्यक्तिरेखेवर खूप प्रेम केलं आणि अक्षरशः डोक्यावर उचलून धरलं. मालिका जरी संपली असली तरी प्रेक्षक शेवंताला अजूनही मिस करतात. हे बघून मला खूप आनंद होतो. पण शेवंताचा प्रवास त्या मालिकेसोबत संपला आणि पुन्हा एकदा मला टेलिव्हिजन या माध्यमाकडे वळण्याची ओढ लागली. म्हणून मी झी युवा वरील 'तुझं माझं जमतंय' हि मालिका स्वीकारली आणि त्यात मी साकारत असलेली पम्मी हि व्यक्तिरेखा देखील भन्नाट आहे. पम्मीला पाहताना प्रेक्षक शेवंताला पूर्णपणे विसरून जातील आणि पम्मीच्या प्रेमात पडतील."

अपूर्वा नेमळेकरच्या अदा, सोशल मीडियावरील फोटोवर रसिक फिदा

 

Web Title: Glamours entry by shevanta in serial promo 'tujha majha jamtay'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.