'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 07:17 PM2021-10-05T19:17:06+5:302021-10-05T19:17:37+5:30

'रंग माझा वेगळा'मधील दीपाच्या ग्लॅमरस फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Glamorous photo shared by Deepa in 'Rang Mazha Vegla', fans say- Paramsundari! | 'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

'रंग माझा वेगळा'मधील दीपाने शेअर केले ग्लॅमरस फोटो, चाहते म्हणताहेत- परमसुंदरी!

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'रंग माझा वेगळा' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत कार्तिक, दीपा, सौंदर्या, ललित, श्वेता आणि आदित्य या सर्व पात्रांना प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेत दीपाची भूमिका अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने साकारली आहे. तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती आहे. रेश्मा सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती तिचे फोटो शेअर करत असते आणि तिच्या फोटोंना चाहत्यांची पसंतीदेखील मिळताना दिसते. दरम्यान नुकतेच तिने सोशल मीडियावर ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

अभिनेत्री रेश्मा शिंदे हिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर स्कर्ट टॉपमधील फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तिने लिहिले की, घर प्रेमाने भरा. तेव्हा ते  घर बनते.

या फोटोत रेश्मा शिंदे खूपच सुंदर दिसते आहे. तिच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. तिच्या या फोटोवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. एका चाहत्याने लिहिले की परमसुंदरी, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, सुंदरी. आणखी एक युजरने लय भारी दिसते आहेस असे लिहिले आहे.


रंग माझा वेगळा मालिकेत सध्या दीपा तिच्या खोकल्यावरील उपचारासाठी मुंबईत आली आहे. तिची लेक कार्तिकी तिला उपचारासाठी घेऊन आली आहे आणि तेही डॉ. कार्तिकच्या हॉस्पिटलमध्ये. जेव्हा दीपाला कळते की कार्तिकी तिला कार्तिककडे घेऊन आली आहे. तेव्हा ती टाळाटाळ करते आणि तिला समजावून अश्विनीकडे घेऊन येते. आता ती अश्विनीच्या ओळखीने दुसऱ्या डॉक्टरांकडे ट्रिटमेंट घेताना दिसणार आहे. तर दुसरीकडे दीपिकाला आई हवी आहे. तिने कार्तिककडे आई आणण्याचा हट्ट केला आहे. त्यामुळे कार्तिकलाही आयेशासोबत लग्न करायचे आहे. मात्र दीपिकाला आयेशा आई म्हणून नको आहे.

सौंदर्यादेखील कार्तिकला तुझा घटस्फोट झाला नसल्यामुळे तू लग्न करू शकत नाही असे सांगते. त्यामुळे आता दीपा आणि कार्तिकची भेट होणार का आणि पुन्हा एकदा ते त्यांच्या नात्याला एक संधी देणार का हे पाहावे लागेल.

Web Title: Glamorous photo shared by Deepa in 'Rang Mazha Vegla', fans say- Paramsundari!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.