Gayatri to learn about Mahendra and Abhisheks secret on Sony SABs Bhakharwadi | 'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ?

'भाखरवडी'मध्‍ये गायत्रीला महेंद्र आणि अभिषेकचे गुपित समजणार ?

वास्‍तविक जीवनाला दाखवणारी मालिका 'भाखरवडी' तिच्‍या हलक्‍याफुलक्‍या पटकथेसह प्रेक्षकांना आकर्षून घेत आहे. पुण्‍याच्‍या पार्श्‍वभूमीवर असलेली 'भाखरवडी' ही भाखरवडी व्‍यवसायामध्‍ये एकमेकांशी स्‍पर्धा करत असलेल्‍या मराठी व गुजराती कुटुंबांमधील वैचारिक मतभेदावरील विनोदी मालिका आहे. आगामी एपिसोड्समध्‍ये प्रेमीयुगुल गायत्री आणि अभिषेक विवाह बंधनात अडकण्‍यास सज्‍ज असताना मालिकेमध्‍ये अनपेक्षित वळण पाहायला मिळणार आहे. 


ठक्‍कर व गोखले कुटुंब दोन्‍ही कुटुंबांमधील बहुप्रतिक्षित गठबंधनाची तयारी करत आहेत. पण महेंद्र (परेश गनात्रा) आणि अण्‍णा (देवेन भोजानी) यांच्‍यामधील वैचारिक मतभेद पुन्‍हा एकदा अडथळा निर्माण करतात. अण्‍णांची कमी खर्चामध्‍ये विवाह करण्‍याची इच्‍छा आहे, तर महेंद्रची अगदी दिमाखात विवाह करण्‍याची इच्‍छा आहे. अचंबित करणा-या घटनांसह अभिषेक (अक्षय केळकर) महेंद्रसोबत हातमिळवणी करतो आणि भव्‍यदिव्‍य विवाह करण्‍याबाबत अण्‍णाला पटवण्‍याचे मंजूर करतो. 

महेंद्र स्‍वत: एक पत्रकार असल्‍याचे ढोंग करतो, त्‍यानंतर दुधवाला असल्‍याचे ढोंग करतो आणि अण्‍णाची पुण्‍यामधील त्‍यांची लोकप्रियता व मान्‍यतेसाठी प्रशंसा करतो. तो त्‍यांना सांगतो की, सर्वजण या भव्‍य सोहळ्याची वाट पाहत आहेत. गायत्रीला (अक्षिता मुदगल) महेंद्रच्‍या वागण्‍याचा संशय येऊ लागतो आणि ती स्‍वत: सरदारजीचे ढोंग करण्‍याचे ठरवते. ती महेंद्र व अभिषेकसह सर्वजण अण्‍णांच्‍या साधेपणावर हसत असल्‍याचे ऐकते. गायत्रीला खूपच राग येतो आणि ती नाराज देखील होते.


गायत्रीची भूमिका साकारणारी अक्षता मुदगल म्‍हणाली, ''गायत्री ही तत्‍त्‍ववादी महिला आहे आणि अण्‍णांचे विचार व समर्पिततेचा आदर करते. ठक्‍कर व गोखले हे दोन्‍ही कुटुंब विवाहासाठी उत्‍सुक आहेत. या एपिसोड्ससाठी शूटिंग करताना खूप मजा येत आहे. असे वाटते की, मी खरोखरंच माझ्या स्‍वत:च्‍या विवाहाची तयारी करत आहे. आगामी एपिसोड्स अचंबित करणारे ट्विस्‍ट घेऊन येणार आहेत. मी आमच्‍या सर्व लाडक्‍या प्रेक्षकांना मालिका पाहत राहण्‍याची विनंती करते. तसेच मी आमच्‍यावर प्रेमाचा वर्षाव करण्‍यासह आम्‍हाला पाठिंबा दिलेल्‍या सर्वांचे आभार मानते. हे अत्‍यंत आनंददायी आहे.''  


अभिषेकची भूमिका साकारणारा अक्षय केळकर म्‍हणाला, '' अखेर अभिषेकचा त्‍याच्‍या प्रेमिकेसोबत विवाह होणार आहे. यामध्‍ये काही गुंतागुती देखील आहेत. पुढे काय घडते हे पाहणे आमच्‍या प्रेक्षकांसाठी अगदी रोचक असणार आहे.''  महेंद्रची भूमिका साकारणारा परेश गनात्रा म्‍हणाला, ''दोन्‍ही कुटुंबे सेलिब्रेशनच्‍या मूडमध्‍ये आहेत आणि संपूर्ण सेटवर आनंद पसरला आहे. मी या एपिसोड्ससाठी शूटिंगचा आनंद घेत आहे आणि आगामी एपिसोड्सबाबत आमच्‍या प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे.'' 

Web Title: Gayatri to learn about Mahendra and Abhisheks secret on Sony SABs Bhakharwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.