ठळक मुद्दे गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. गायत्रीने शेअर केलेल्या फोटोंंमध्ये आपल्याला तिची आई, तिचा भाऊ आणि वडील पाहायला मिळत आहेत.

'तुला पाहते रे' ही मालिका सध्या तुफान गाजतेय. या मालिकेतील गायत्री दातार, शिल्पा तुळसकर आणि सुबोध भावे यांचा अभिनय प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. या मालिकेत विक्रांतच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच राजनंदिनीची एंट्री झाल्यापासून आता मालिकेत पुढे काय होणार याची उत्सुकता लोकांना लागलेली आहे. इशा ही गेल्या जन्मात राजनंदिनी होती का असा प्रश्न देखील आता या मालिकेच्या चाहत्यांना पडायला लागला आहे.

तुला पाहते रे ही गायत्री दातारची पहिली मालिका असली तरी तिला या मालिकेमुळे चांगलीच लोकप्रियता मिळत आहे. पुण्याच्या गायत्रीने या मालिकेतून प्रमुख भूमिका सादर करत टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केले आहे. पदार्पणातच तिला सुबोध भावे सोबत काम करण्याची संधी मिळाली आणि या संधीचं तिने सोनं केलं.

आज तिला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून तिचे फॅन्स तिला मोठ्या संख्येने सोशल मीडियावर फॉलो करतात. गायत्री तिच्या खऱ्या आयुष्यातील, तिच्या फॅमिलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

गायत्रीने शेअर केलेल्या फोटोंंमध्ये आपल्याला तिची आई, तिचा भाऊ आणि वडील पाहायला मिळत आहेत.

गायत्री दातार मालिकेत साकारत असलेली इशा निमकर ही अत्यंत साधी आणि सोज्वळ मुलगी आहे. तिला जगातील छक्के पंजे कळत नाहीत. पण खऱ्या आयुष्यात गायत्री खूपच वेगळी आहे. ती खूप अॅडव्हेंचर्स असून तिला ट्रेकिंगची तसेच फिरायची खूप आवड आहे. गायत्रीने मनालीला ट्रेकिंगचा आणि कोयना नदीत रिव्हर राफ्टिंगचा धमाल अनुभव घेतलेला आहे.

गायत्रीने अनेक निर्सगरम्य ठिकाणी भेटी दिल्या आहेत त्यातील एक म्हणजे लेह लडाख. तिचे हे सर्व अनुभव तिने तिच्या सोशल मीडियावर फोटोंच्या रूपात शेअर केले आहेत.

मालिकेतील गोंधळली इशा खऱ्या आयुष्यात स्पष्टवक्ती आणि कॉलेजमध्ये प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने भाग घेणारी उत्साही मुलगी आहे. ऑनस्क्रीन साधी सरळ इशा आणि ऑफस्क्रीन अॅडव्हेंचरस गायत्री या दोघींवर प्रेक्षक तितकाच प्रेमाचा वर्षाव करतात यात काहीच शंका नाही.


Web Title: Gayatri Datar real life family photos
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.