गौहर खानच्या सासूबाईंनी होणाऱ्या सूनेचे केलं जंगी स्वागत, फोटो व्हायरल

By गीतांजली | Published: November 6, 2020 05:24 PM2020-11-06T17:24:55+5:302020-11-06T17:33:57+5:30

'बिग बॉस 7' ची विजेता गौहर खान इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारशी लग्न करणार आहे.

Gauahar khan mother in law farzana welcomes her warmly in their family | गौहर खानच्या सासूबाईंनी होणाऱ्या सूनेचे केलं जंगी स्वागत, फोटो व्हायरल

गौहर खानच्या सासूबाईंनी होणाऱ्या सूनेचे केलं जंगी स्वागत, फोटो व्हायरल

googlenewsNext

'बिग बॉस 7' ची विजेता गौहर खान इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारशी लग्न करणार आहे. दोघांनी अलीकडेच आपला साखरपुडा झाल्याची घोषणा केली . आता गौहर खानच्या होणाऱ्या सासूबाईं फरजाना दरबार यांनी आपल्या सूनचे खुल्या मनाने स्वागत केले आहे. गौहरने आपल्या सासूसोबतचे फोटो शेअर केले आहेत. हा फोटो गौहर खानच्या वाढदिवसाचा आहे. ज्यावेळी तिच्या सासूबाई तिच्या गालावर चुंबन घेताना दिसत आहेत.

 या फोटोत फरजाना आणि गौहर दोघेही खूप खुश दिसायेत. फरजाना यांनी या फोटोला कॅप्शन देताना लिहिले आहे, 'आमच्या घरात आपलं स्वागत आहे. जैद दरबार आणि गौहर खानला हार्दिक शुभेच्छा. माझे प्रेम आणि आशीर्वाद, तुम्ही दोघे नेहमी  एकत्र रहा, आनंदी रहा.'  अलीक़ेच  गौहर आणि जैद यांनी एक फोटो शेअर करत ही गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली. या फोटोसोबत गौहरने अंगठीचा इमोजी पोस्ट केला आहे.


 गौहर खान आणि जैद 25 डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, मुंबईच्या एका हॉटेलात सगळे फंक्शन होणार आहेत. 3 दिवस हा सोहळा चालणार आहे. अलीकडे गौहर स्पेशल गेस्ट बनून बिग बॉसच्या घरात गेली होती. दोन आठवडे बिग बॉसच्या घरात राहिल्यानंतर ती घरी परतली. यानंतर लगेच जैदसोबत गोव्यात सुट्टी घालवण्यासाठी गेली. गोव्याची ही ट्रिप प्री-वेडिंग फोटोशूटसाठी खास प्लान करण्यात आली होती, असे कळते.


गौहरने 2009मध्ये बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. रॉकेट सिंग, सेल्ममॅन आॅफ द इअर चित्रपटात गौहर दिसली होती. यानंतर 2011मध्ये आलेल्या गेम या अ‍ॅक्शन थ्रिलर चित्रपटात ही गौहर झळकली होती.

Web Title: Gauahar khan mother in law farzana welcomes her warmly in their family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.