टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीचे हे आहे पहिले प्रेम?जाणून घ्या या प्रेमाविषयी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2017 11:31 AM2017-01-27T11:31:13+5:302017-01-27T17:31:17+5:30

बी-टाऊनच्या अभिनेत्रींप्रमाणेच टीव्ही अभिनेत्रीमध्ये काम्या पंजाबी सगळ्यात जास्त स्टाइलिश टीव्ही अभिनेत्री आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या काम्या ...

Is this the first love of TV actress Kamya Punjabi? Learn about this love | टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीचे हे आहे पहिले प्रेम?जाणून घ्या या प्रेमाविषयी

टीव्ही अभिनेत्री काम्या पंजाबीचे हे आहे पहिले प्रेम?जाणून घ्या या प्रेमाविषयी

googlenewsNext
-टाऊनच्या अभिनेत्रींप्रमाणेच टीव्ही अभिनेत्रीमध्ये काम्या पंजाबी सगळ्यात जास्त स्टाइलिश टीव्ही अभिनेत्री आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. सध्या काम्या पंजाबीला तिच्या अभिनयापेक्षाी नोजरिंगचे वेड लागलेले दिसतेय.इतर अभिनेत्रींप्रमाणे काम्यालाही  वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसच कलेक्शन करण्याचे वेड असेल असे तुम्हाला तिच्या फोटोवरून वाटले असेन.मात्र असे नसून काम्याला ड्रेसचे नाही तर नोजरिंगचे जास्त वेड आहे असे खुद्द काम्यानेच म्हटेल आहे.








काम्याने तिच्याकडे असलेल्या नोजरिंगचे कलेक्शन असलेला एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्या फोटो खाली तिने लिहीले आहे की या सगळ्या नोजरिंगचे कलेक्शन माझे आहे, मला आणखी नोजरिंग हव्या आहेत.यावर तिला तिच्या चाहत्यांनीही एक से बढकर एक अशा कमेंटस देत तू आणखी नोजरिंगचे करणार तरी काय? असे वेगवेगळे प्रश्न विचारले आहेत. 






मुलींकडे नोजरिंग ही एक किंवा दोन इतक्याच असतात. मात्र काम्या कडे 500 हून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या नोजरिंग आहेत. एका पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत काम्या म्हणते, मला नोजरिंग खूप आवडतात, नोजरिंगचे मला इतके वेड आहे की, कोणाला मला काही गिफ्ट द्यायचे असेन तर त्याने मला फक्त आणि फक्त नोजरिंगच द्यावे असेच मी म्हणेन.



जेव्हा जेव्हा मी कुठे फिरायला जाते तेव्हा तिथून फक्त नोजरिंगच  खरेदी करत असते.आतापर्यंत माझ्याकडे  500हून अधिक नोजरिंगचे कलेक्शन आहे. असे काम्याने म्हटले आहे. काम्या फक्त या नोजरिंग जमाच करत नसून प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नोजरिंग घालत आपले सुंदर फोटो क्लिक करत इन्स्टाग्रामवर अपडेट करत असते.दरवेळी वेगवेगळ्या ट्रेंडी नोजरिंगमध्ये काम्याचा ट्रेडिशनल आणि अट्रॅक्टीव्ह लूक दिसतो.काम्याला ज्वेलरीमध्ये फक्त नोजरिंग आवडते,त्यामुळे तिला बांगड्या,गळ्यातले नेकलेस, इअर रिंग्स, फिंगर रिंग्स यांत जास्त रस वाटत नाही.सध्या शक्ती मालिकेतून काम्या रिसकांचे मनोरंजन करत आहे.

Web Title: Is this the first love of TV actress Kamya Punjabi? Learn about this love

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.