अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा या अभिनेत्यावर आरोप, तक्रार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 11:55 AM2020-02-12T11:55:11+5:302020-02-12T11:55:47+5:30

ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये या अभिनेत्याविरोधात गुन्हा दाखल

FIR Against Television Actor Shahbaz Khan For Molesting A Teenage Girl | अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा या अभिनेत्यावर आरोप, तक्रार दाखल

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा या अभिनेत्यावर आरोप, तक्रार दाखल

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील 'फिर लौट आई नागिन', चंद्रकांता व बेताल पच्चीसी या मालिकेत झळकलेला अभिनेता शहबाज खानवर अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मुलीने ओशिवरा पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्याच्याविरोधात कलम ३५४ व ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही माहिती एएनआयने दिली आहे. 


न्यूज एजेंसी एएनआयने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. एएनआयने ट्विटमध्ये लिहिले की, ओशिवरा पोलीस स्टेशनमध्ये अभिनेता शहबाज खानच्या विरोधात छेडछाड प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. कलम ३५४ व ५०९ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. चौकशी सुरू आहे.


शहबाज खान प्रसिद्ध क्लासिकल सिंगर आमिर खान यांचा मुलगा आहे. त्यांच्या आईचे नाव रईसा बेगम आहे. ५३ वर्षीय शहबाजवर एका अल्पवयीन मुलीने छेडछाड केल्याचा आरोप केला आहे. 
इंदौरमध्ये राहणारे शहबाज सिने व टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे. शहबाजने मालिकेसोबत बऱ्याच चित्रपटात काम केले आहे. त्याने चंद्रकांता, युग, अफसर बिटिया, कर्मफल दाता शनि, द ग्रेट मराठा यासारख्या मालिकेत काम केले आहे. 
मालिकेव्यतिरिक्त शाहबाजने कित्येक चित्रपटात काम केले आहे. शहबाजने अमिताभ बच्चन यांच्यासोबत मेदर खान, सैफ अली खानसोबत एजेंट विनोद आणि सनी देओल यांच्यासोबत द हिरो लव स्टोरी ऑफ ए स्पायमध्ये काम केले आहे. त्याला निगेटिव्ह भूमिकेतून जास्त लोकप्रियता मिळाली आहे. 

Web Title: FIR Against Television Actor Shahbaz Khan For Molesting A Teenage Girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.