ठळक मुद्देबिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वात 'सरस्वती' मालिकेतला ‘राघव’ म्हणजेच मुख्य अभिनेता आस्ताद काळे दिसला तर आता बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात या मालिकेतला राघवचा लहान भाऊ कान्हा म्हणजेच अभिनेता माधव देवचके दिसून येत आहे.

‘सरस्वती’ या मालिकेत कान्हाची भूमिका साकारणारा अभिनेता माधव देवचके सध्या  ‘बिग बॉस मराठी 2’च्या घरात आहे. एक समंजस स्पर्धक अशी ओळख त्याने या घरात निर्माण केली आहे. आज फादर्स डे निमित्त त्याचे आणि त्याच्या वडिलांचे काही फोटो आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
 माधव बिग बॉसच्या घरात असल्याने तो वडिलांना प्रत्यक्ष फादर्स डेच्या शुभेच्छा देऊ शकत नाही. पण माधवचे वडिल चारूदत्त देवचके हे मात्र फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या मुलाबद्दल भरभरून बोलले.


 फादर्स डेच्या निमित्ताने संवाद साधताना माधवचे वडिल चारूदत्त देवचके म्हणाले की, लहानपणापासूनच माधवमध्ये समंजसपणा आम्हांला दिसून आलाय. ब-याचदा मुलांची ओळख त्यांच्या वडिलांमुळे असते. पण माझी ओळख माधवच्या लहानपणापासूनच ‘माधवचे बाबा’ अशी होती. 

मी नाट्यनिर्माता असल्यामूळे माझ्या ओळखीचा फायदा माधवला करीयरमध्ये कधी ना कधी व्हावा, अशी माझी इच्छा होती. पण माधवने कुठेही माझी ओळख न वापरता स्वत:च्या ताकदीवर स्वत:चे करीयर घडवले, याचा मला अभिमान आहे. अभिनेत्याच्या करीयरमध्ये ब-याचदा आर्थिक उतार-चढाव होत असतात, पण अशावेळेसही मी देऊ केलेली मदत स्वावलंबी माधवने कधीच स्विकारली नाही. 

बिग बॉस मराठी 2’मधील माधवच्या वाटचालीविषयीही त्याचे वडिल बोलले. बिग बॉसमध्ये माधव खूप चांगलं खेळतोय. कुठेही पातळी न घसरू देता, आणि आपले संस्कार न विसरता तो खेळतोय, याचा मला अभिमान आहे. राग व्यक्त करतानाही तो खूप संयतपणे व्यक्त करतोय. बिग बॉस जिंकून येण्यासाठी माधवला माझ्या शुभेच्छा, असे ते म्हणाले.


Web Title: Fathers Day Special: bigg boss marathi 2 contestant madhav deochake pics
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.