गुड्डू (पारस अरोरा) आणि फुंटीच्‍या प्रेमकथेमध्‍ये नुकताच मोठा बदल झाला होता. फुंटीची (शिवानी बदोनी) गुड्डूची पत्‍नी असल्‍याबाबत स्‍मृती हरवली होती. छोट्या पडद्यावरील  मालिका 'बावले उतावले'ने ३ वर्षांची लीप घेतली आहे. काही नवीन पात्रांची भर करत कथेमध्‍ये नवीन वळण आणले. एका उत्‍साही तरूण जोडप्‍याच्‍या विनोदी व गोड प्रवासासाठी प्रेक्षकांनी या मालिकेची प्रशंसा केली आहे. ही जोडी पुन्‍हा एकदा एकमेकांचे प्रेम मिळवण्‍याच्‍या प्रयत्‍नात आहे.  

 


मालिकेमध्‍ये प्रवेश केलेला फुंटीचा थेरपीस्‍ट सलमान (गौरव वाधवा) देखील फुंटीचे मन जिंकण्‍याचा प्रयत्‍न करत आहे. ज्‍यामुळे गुड्डूची त्‍याच्‍या पत्‍नीला पुन्‍हा मिळवण्‍याचे मिशन अधिक आव्‍हानात्‍मक बनले आहे. सलमान त्‍याच्‍या थेरपी उपचाराचा भाग म्‍हणून त्‍याचा 'पहिला पैत्रा' वापरण्‍यासाठी सज्‍ज आहे. तो फुंटीला संमोहन करत सांगतो की, तिला सीझनच्‍या पहिल्‍या पावसामध्‍ये तिचा जोडीदार मिळेल. 

 


सलमान पाऊस पडल्‍यानंतर फुंटीला प्रथम तोच दिसेल याची काळजीपूर्वक योजना आखतो. पण दैव गुड्डूच्‍या बाजूने असते. पावसात फुंटीला प्रथम गुड्डूच दिसतो. फुंटीच्‍या मनात गुड्डूसाठी प्रेमभावना निर्माण होऊ लागतात. पण त्‍याचवेळी तिला तो तिचा जोडीदार असल्‍याचे जाणवू लागले. 
गुड्डूची भूमिका साकारणारा पारस अरोरा म्‍हणाला, ''गुड्डू त्‍याच्‍या सुंदर पत्‍नीला पुन्‍हा जिंकण्‍याच्‍या प्रयत्‍नामध्‍ये आहे. पण त्‍याचा प्रतिस्‍पर्धी सलमान तिचे मन जिंकण्‍यासाठी कारस्‍थाने रचत आहे. ही कथा अत्‍यंत रंजक आहे आणि मालिकेत लीप आल्यानंतरही मालिकेचा आनंद घेत आहे. आगामी एपिसोड्स काही धक्‍कादायक ट्विस्‍ट्स रसिकांना पाहायला मिळणार आहेत.


फुंटीची भूमिका साकारणारी शिवानी बदोनी म्‍हणाली, ''मी प्रथम आमच्‍यावर सतत प्रेमाचा वर्षाव करत आम्‍हाला पाठिंबा दिलेल्‍या आमच्‍या सर्व प्रेक्षकांचे आभार मानते. हे अत्‍यंत आनंददायी आहे. मी त्‍यांना आमच्‍या मालिकेसह अधिक मनोरंजन देण्‍यासाठी उत्‍सुक आहे. काळझेपनंतर फुंटी पूर्णत: बदलली आहे. ती वेगळ्या प्रकारे पोशाख परिधान करते आणि सर्वात महत्‍त्‍वाचे म्‍हणजे तिची गुड्डूची पत्‍नी असल्‍याबाबतची स्‍मृती हरवली आहे. हा अत्‍यंत रोमांचक आठवडा असणार आहे. म्‍हणून गुफुच्‍या प्रेमकथेतील ट्विस्‍टबाबत जाणून घेण्‍यासाठी मालिका पाहत राहा.'' 
 


Web Title: Fate brings Guddu and Funty together again on Sony SAB's Baavle Utaavle
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.