फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 07:15 AM2018-12-15T07:15:00+5:302018-12-15T07:15:00+5:30

सुनिल ग्रोव्हरचा कमबॅक कॉमेडी शो स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांनी उपस्थिती लावली.

Farah Khan took Ranveer Singh's Dance Class | फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास

फराह खानने घेतला रणवीर सिंगचा डान्स क्लास

googlenewsNext
ठळक मुद्देदीपिका पादुकोणच्या लव्हली गाण्यावर थिरकला रणवीर सिंगफराह खानने शिकवल्या रणवीर सिंगला डान्स स्टेप

सुनिल ग्रोव्हरचा कमबॅक कॉमेडी शो स्टार प्लसवरील 'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये रणवीर सिंग आणि रोहित शेट्टी यांनी उपस्थिती लावली. यात अव्वल दिग्दर्शिका नृत्यदिग्दर्शिका फराह खानने रणवीर सिंगला त्याची पत्नी दीपिकाचे हिट गाणे 'लव्हली'वरील काही स्टेप्सही शिकवल्या.


फराह खान ह्या शोमध्ये दुसऱ्यांच्या भानगडीत नाक खुपसणाऱ्या शेजारणीची भूमिका करत आहे. सूत्रांनुसार, एका रोचक भागात रणवीर सिंगला हॅपी न्यू इयर चित्रपटावर अभिनय करायचा होता, तेव्हा त्याने लव्हली ह्या गाण्यावरील स्टेप्स करण्याचा प्रयत्न केला. ते पाहून कोरियोग्राफर फराह खान त्याला मदत केली. तिनेच दीपिका पादुकोणसाठी ह्या गाण्यावर कोरियोग्राफी केली होती. रणवीर सिंगने फराह खानसोबत ह्या मूव्ह्‌स केल्या आणि सगळ्‌यांना खुश केले.
'कानपुर वाले खुराणाज्‌'मध्ये रणवीर सिंगसोबत सिम्बाचे दिग्दर्शक रोहित शेट्टी, विनोदवीर सुनिल ग्रोव्हर, अली असगर आणि सूत्रधार अपारशक्ती खुराणा यांच्यासोबत धम्माल केली. 'कानपूरवाले खुराणाज' या नव्या कौटुंबिक विनोदी मालिकेत जिजा-मेव्हणी यांच्यातील संबंधांवर भर देण्यात आला असून २०१८ वर्षाची अखेर या नव्या मालिकेच्या प्रसारणाने होईल. या मालिकेत अनेक विनोदवीर वेळोवेळी सहभागी होणार असून त्यांचे संवाद, प्रसंग आणि नकला यांच्याद्वारे दर आठवड्यास एक नवी संकल्पना मालिकेत सादर केली जाईल. तसेच बॉलीवूडमधील संगीत, चित्रपट आणि अन्य क्षेत्रांतील सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी हे या मालिकेत दर आठवड्यास विशेष अतिथीच्या रूपात सहभागी होणार असल्याने मालिकेचा ग्लॅमर आणि मनोरंजनाच्या स्तर खूपच उंचावणार आहे.
 

Web Title: Farah Khan took Ranveer Singh's Dance Class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.