ठळक मुद्दे अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे

झी मराठी वरील ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिका सध्या एका अतिशय रंगतदार वळणावर आली आहे. मालिकेच्या पहिल्या पर्वाला प्रेक्षकांनी जसा भरभरून प्रतिसाद दिला तसंच या २ भागावर देखील प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या मालिकेत जेव्हापासून शेवंताची एंट्री झाली आहे तेव्हापासून मालिकेची लोकप्रियता आणखी वाढली आहे. अपूर्वा नेमळेकर या मालिकेत शेवंताची व्यक्तिरेखा साकारत आहे आणि पाहता पाहता या व्यक्तिरेखेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे.


शेवंताचे चाहते देखील असंख्य आहेत. 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेचं चित्रीकरण कोकणात सुरू आहे आणि ज्या घरामध्ये हे चित्रीकरण सुरू आहे तिथे या कलाकारांना पाहण्यासाठी सतत लोकांची गर्दी होत असते. या मालिकेतली बहुचर्चित शेवंता, म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरला भेटण्यासाठी चाहते मोठी गर्दी करतात.  कोकणात फिरायला येणारी कुंटुंब आवर्जून नाईकांच्या वाड्याला भेट देतात.

हे घर म्हणजे जणू एक पर्यटनस्थळच झालेलं आहे. मालिकेतल्या इतर पात्रांना भेटण्याची उत्सुकता सर्वांना असते. पण, त्यातही शेवंताबरोबर फोटो, सेल्फी काढण्यासाठी लोकांची नेहमी गर्दी होत असते.

या चाहत्यांच्या घोळक्यासोबत अपूर्वाने फोटो काढून तिच्या सोशल मीडियावर शेअर केला.शेवंताची अपूर्वाची भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली आहे की, तिचे फॅन्स आता मोठ्या संख्येने सोशल मीडियावर तिला फॉलो करत आहेत. तिने काही दिवसांपूर्वी फेसबुकवर पोस्ट केलेली एक पोस्ट तिच्या फॅन्सचे लक्ष वेधून घेत आहे. 
 


Web Title: Fan creating rush to see Apurva nemlekar on Ratris Khel Chale 2 set
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.