गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या हस्ते टीझर लाँच झाल्यानंतर अधिकृत म्युझिक व्हिडिओ आता “कोकिलाबेन अंबानी” यांनी अनावरण केले आहे. गरबा क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या यूट्यूब पेजवर अनंत चतुर्दशीच्या शुभ मुहूर्तावर हे गाणे प्रसिद्ध झाले आहे. 


कोकिलाबेन अंबानी म्हणाल्या, “जिगर आणि सुहराद या दोघांनाही फाल्गुनी पाठक यांचे पाठबळ लाभले आहे. त्यांच्या या नवीन म्युझिक व्हिडिओंसाठी खूप शुभेच्छा. 


दांडिया क्वीन फाल्गुनी पाठकने स्वत:ला सोनी बंधूंच्या नृत्याची चाहते आहे असे सांगितले आहे. “जेव्हा जेव्हा मी स्टेजवर जात होती तेव्हा माझे लक्ष एसएसजीडीकडे जाते तेव्हा त्यांची गरबा करतानाची प्रतिभा आणि ऊर्जा पाहून मी विचलित झाले. हे गाणे म्हणजे संस्कृती आणि कलेबद्दलच्या आमच्या परस्पर प्रेमाचा विस्तार आहे आणि त्यातील मी एक भाग बनू शकली याचा मला आनंद आहे, ”असे फाल्गुनी पाठक म्हणाली.

जिगर सोनी यांनी सांगितले, "शैल हाडा आणि फाल्गुनी पाठक हे दोन मोठे कलाकार आहेत जे आम्ही आतापर्यंत पाहत आलो आहोत. ह्या व्हिडिओमध्ये त्यांचा सहभाग लाभणे हा आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे कारण आम्ही फाल्गुनी तसेच शैल  यांचे सर्वात मोठे चाहते आहोत. 

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Falguni Pathak launches a new music album

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.