मंदाना करिमी 'बिग बॉसच्या 9' व्या सिझनमध्ये झळकली होती. बिग बॉसमध्ये येताच मंदाना करीमीला तुफान पब्लिसिटी मिळाली. रोज तिच्या नवनवीन बातम्या कानावर पडायच्या. बिग बॉसच्या घरात तिची इमेज भांडखोर म्हणूनच होती. कारण बिग बॉसच्या घरातील प्रत्येक केंटेस्टंससोबत तिचे खटके उडाले होते. तिने एक स्वतःची इमेज निर्माण केली होती. ती मेकअपशिवाय एक दिवसही राहू शकत नव्हती. मंदानाने नेहमीच हॉट फोटोशूट करत असते. आता थेट तिचा एक सेक्सी व्हिडीओ समोरल आला आहे.  मंदानाचा एक वेगळाच अंदाज पाहायला मिळतोय. 

 

बिग बॉसमध्ये जास्त पब्लिसिटी मिळून सुद्धा शो संपल्यानंतर मंदानाचे फिल्मी करिअरची गाडी सुस्साट पळालीच नाही.त्यामुळे तिने सा-यांचे लक्ष वेधण्यासाठी बोल्ड फोटो काढण्याचा मार्ग निवडला. त्यामुळे नेहमी मंदना तिचे बोल्ड फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. फोटोंमुळे ती नेटीझन्सचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असते. काही दिवसांपूर्वी तिने सोशल मीडियावर टॉपलेस फोटो शेअर केला होता. तिचा हा अंदाज पाहून नेटीझन्सही क्लीन बोल्ड झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

‘क्या कुल है हम 3’ सिनेमामधून मंदानाने बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. मात्र सिनेमाला फारसे यश मिळाले नाही. तसेच तिला बॉलीवूडमध्ये पाहिजे तशा खास संधीही मिळाल्या नाहीत. तुर्तास तिचे बोल्ड फोटो आणि व्हीडीओ पाहून सोशल मीडियावर पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा अशाच कमेंटस मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

Web Title: Ex- Bigg Boss Contestants Mandana karimi Shares Topless Photo Looks Bold And Beautiful

Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.