OMG: रिसेप्शनमध्ये रेखा यांना पाहताच अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 07:15 PM2021-12-06T19:15:08+5:302021-12-06T19:16:13+5:30

लग्नानंतर मुंबईत नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा रंगला. या सोहळ्याला मालिका विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती.

Even the bride Actress couldn't stop herself screaming when see saw Rekha, check what happened at Reception of Neel Bhatt & Aishwarya Sharma | OMG: रिसेप्शनमध्ये रेखा यांना पाहताच अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

OMG: रिसेप्शनमध्ये रेखा यांना पाहताच अभिनेत्रीची झाली अशी अवस्था, व्हिडीओ होतोय प्रचंड व्हायरल

googlenewsNext

सध्या लग्नाचा मौसम सुरु आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. बॉलिवूड कलाकारांसोबत टीव्ही कलाकारसुद्धा विवाहबंधनात अडकत आपल्या आयुष्याची नवीन सुरुवात करत आहेत. नुकतेच 'गुम है किसीके प्यार मे' मालिकेतले नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा विवाहबंधनात अडकले आहेत.काही जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत हे लग्न पार पडले. मध्य प्रदेशमधल्या उज्जैनमध्ये दोघांचं लग्न पारंपरिक पद्धतीने पार पडलं.

लग्नानंतर मुंबईत नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा  यांचा ग्रँड रिसेप्शन सोहळा रंगला.  या सोहळ्याला मालिका विश्वातील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. मात्र या सगळ्यात रेखा यांची उपस्थिती साऱ्यांसाठी चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरली आहे. ​नवदाम्पत्याला आशिर्वाद देण्यासाठी रेखा यांनी उपस्थिती लावली होती. विशेष म्हणजे रेखा यांची उपस्थितीने सगळ्यांनाच आश्चर्यचकीत केले होते. रिसेप्शनला उपस्थित प्रत्येक कलाकार यावेळी आवर्जुन रेखा यांची भेट घेत होता. त्यांच्यासोबत फोटो काढत होता. 

रेखा यांची भेट होणंच काही कलाकारांसाठी मोठं सरप्राईज होतं. इतकंच काय तर नववधू ऐश्वर्या शर्मासुद्धा रेखा तिला आशिर्वाद द्यायला आल्याचे पाहून विश्वास बसत नव्हता. या संपूर्ण रिसेप्शनमध्ये रेखा सगळ्यांसाठी आकर्षण ठरत होत्या. त्यामुळे स्टेजवर रेखाला पाहताच ऐश्वर्या इतकी भारावली की, तिचा आनंद व्यक्त करताना तिने मोठ्याने ओरडत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. रेखा स्टेजवर येताच तिने त्यांचा आशिर्वाद घेतला. फक्त उपस्थितांनाच नाही तर नवदाम्पत्यांनाही रेखाने स्वतः रिसेप्शनला हजर राहून सरप्राईज दिल्याचे पाहायला मिळाले. 

सध्या रेखा यांचा हाच व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरच चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. एकीकडे रेखाचे सगळेच कौतुक करत आहेत. तर नवदाम्पत्यांवर शुभेच्छांचा वर्षावही करत आहेत. सोशल मीडियावर नील भट्ट आणि ऐश्वर्या शर्मा यांच्या लग्नातल्या खास क्षणांचे फोटोही प्रचंड व्हायरल होत आहेत. नील आणि ऐश्वर्या यांच्या लूकलाही चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे. तसेच व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये दोघांमध्ये खूप चांगली केमिस्ट्री असल्याचे पाहायला मिळत आहे. लग्नसोहळा आणि रिसेप्शननंतरसुद्धा सोशल मीडियावर या दोघांचीच चर्चा पाहायला मिळत आहेत.

Web Title: Even the bride Actress couldn't stop herself screaming when see saw Rekha, check what happened at Reception of Neel Bhatt & Aishwarya Sharma

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rekhaरेखा