'तारक मेहता...'मध्ये दयाबेनच्या स्वागतासाठी होणार ग्रॅण्ड सेलिब्रेशन, अशी घेणार ती एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 06:58 PM2019-10-04T18:58:29+5:302019-10-04T19:01:03+5:30

तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिशा वकानी परतणार असल्याचं वृत्त ऐकल्यापासून चाहते खूप उत्सुक झाले आहेत.

The entry will be titled Grand Celebration to welcome Dayaben in 'Tarak Mehta ...' | 'तारक मेहता...'मध्ये दयाबेनच्या स्वागतासाठी होणार ग्रॅण्ड सेलिब्रेशन, अशी घेणार ती एन्ट्री

'तारक मेहता...'मध्ये दयाबेनच्या स्वागतासाठी होणार ग्रॅण्ड सेलिब्रेशन, अशी घेणार ती एन्ट्री

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिशा वकानी परतणार असल्याचं वृत्त ऐकल्यापासून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ती मालिकेत कधी व कशी एन्ट्री करणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत.


स्पॉटबॉयच्या रिपोर्टनुसार, दिशा वकानी लवकरच मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात करणार आहे. मालिकेत दिशाची एन्ट्री खूप ग्रॅण्ड होणार आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमादरम्यान ती एन्ट्री करणार असल्याचं समजतं आहे. खरंतर गोकुळधाम सोसायटी नवरात्रीमधील गरब्यादरम्यान दयाबेनला खूप मिस करत आहेत.  


जेठालालला त्याची पत्नी दयाची खूप आठवण येते आहे आणि ते देवी समोर वचन देतात की दया परत येत नाही तोपर्यंत गरबा खेळणार नाही. या कारणामुळे दयाबेनला परत गोकुळधाम सोसायटीमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करू लागतात. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरतात. आता ते सगळे ती परतण्याची आशा सोडतात आणि आता दयाबेन एन्ट्री करणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी दयाबेनची एन्ट्री स्पेशल बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले आहेत.


तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते असित मोदी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं की, दिशा लवकरच मालिकेत दिसणार आहे. यात एक महिनादेखील लागू शकतो.


दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी सप्टेंबर, २०१७ पासून शोमध्ये दिसत नाही आहे. ती प्रेग्नेंसी लीववर गेली होती. त्यानंतर मालिकेत परतलीच नाही. त्यामुळे तिचे चाहते तिच्या कमबॅकची वाट पाहत आहेत. 

Web Title: The entry will be titled Grand Celebration to welcome Dayaben in 'Tarak Mehta ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.