Ekta Kapoor did not share your child's photo yet, Even After Five Months | पाच महिने उलटूनही अद्याप एकता कपूरने शेअर केला नाही आपल्या मुलाचा फोटो, जाणून घ्या कारण
पाच महिने उलटूनही अद्याप एकता कपूरने शेअर केला नाही आपल्या मुलाचा फोटो, जाणून घ्या कारण

सेलिब्रेटी आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट हे आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. मात्र एकता कपूर या सगळ्या गोष्टींसाठी अपवादच ठरली आहे.  २७ जानेवारी रोजी सरोगसीच्या माध्यमातून एकता कपूरने बाळाला जन्म दिला. एकताने रवी असे आपल्या बाळाचे नाव ठेवले आहे. इतके दिवस उलटूनही एकताने मात्र आपल्या बाळाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केलेला नाही. एकता कपूरने असे का केले असावे यावर एका मुलाखतीत तुषार कपूरने सांगितले की, रवी अजून लहान आहे. तसेच लहान मुलांचे फोटो अशा प्रकारे शेअर केले जात नाही असा समज आहे. त्यातच कुटुंबाच्या सांगण्यानुसार एकताने रवीचा कोणताच फोटो सोशल मीडियावर शेअर केलेला नाही. रवी थोडा मोठा झाला की, त्याच्याही बाललीला सोशल मीडियावर दिसतीलच असे सांगितले. 

 


तसेच तुषार कपूरनेही एकता प्रमाणे सरोगसी करून मुलाला जन्म देण्याचा निर्णय घेतला होता.  कपूर कुटुंबातील ते पहिले नातवंड आहे. तुषारच्या निर्णयाला वडिल जितेंद्र आणि आई शोभा यांनीही पाठिंबा दिला होता. तुर्तास तुषारचा मुलगा लक्ष्यही आता मोठा झाला आहे. त्यामुळे त्याचे फोटो तुषार सोशल मीडियावर शेअर करत असतो. बॉलिवूडमध्ये  अनेक सेलिब्रेटींनी सिंगल पॅरेंटीगचा मार्ग निवडत आपल्या मुलांचे पालनपोषण करत आहेत. 


Web Title: Ekta Kapoor did not share your child's photo yet, Even After Five Months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.