रणजीतसाठी घराचे दरवाजे होणार कायमचे बंद; सत्य समजल्यावर आईसाहेबांनी घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:56 PM2022-01-28T16:56:22+5:302022-01-28T16:58:30+5:30

Raja rani chi g jodi: रणजीतचं सत्य समोर आल्यानंतर खचून गेलेल्या संजीवनीसाठी आईसाहेबांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Doors will be permanently closed for Ranjit; After realizing the truth, Aisaheb took a big decision | रणजीतसाठी घराचे दरवाजे होणार कायमचे बंद; सत्य समजल्यावर आईसाहेबांनी घेतला मोठा निर्णय

रणजीतसाठी घराचे दरवाजे होणार कायमचे बंद; सत्य समजल्यावर आईसाहेबांनी घेतला मोठा निर्णय

googlenewsNext

छोट्या पडद्यावर सध्या गाजत असलेली मालिका म्हणजे म्हणजे 'राजा रानीची गं जोडी'. अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या या मालिकेत मध्यंतरी अनेक रंजक वळणं आल्याचं पाहायला मिळालं. संजीवनी आणि रणजीत यांच्या संसारात बरीच वादळं येऊन गेली. मात्र, या संकट काळात दोघांनीही त्यांची साथ कधीच सोडली नाही. परंतु, आता या दोघांच्या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. रणजीतचं सत्य संजूसमोर आलं आहे. त्यामुळे खचून गेलेल्या संजीवनीसाठी आईसाहेबांनी मोठा निर्णय घेतला आहे.

कलर्स मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये संजीवनी आईसाहेबांजवळ रडत आहे. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून आईसाहेब रणजीतला घरातून बेदखल करण्याचा निर्णय घेतात.

'एकदा त्यांच्याशी समोरासमोर बोलले तर बरं होईल', असं संजीवनी म्हणते आणि रडू लागते. "तिच्या डोळ्यातील पाणी पाहून आईसाहेब तिला सावरण्याचा प्रयत्न करतात. तसंच रडू नका. लेकीच्या डोळ्यातलं पाणी आईला कधीच पाहावत नाही. आणि, आमचं ठरलंय. ज्या माणसाने आमच्या लेकीची फसवणूक केली त्या रणजीतरावांचा या घराशी आणि या घरातील माणसांची काहीही संबंध नाही", असं सांगतात.

दरम्यान, रणजीत एका मिशनवर काम करत असून तो सध्या पुण्यात साक्षीसोबत राहत आहे. परंतु, साक्षीसोबत राहत असताना ते दोघंही नवरा-बायको असल्याचं खोटं नाटक करतात. परंतु, संजू आणि घरातल्यांसमोर वेगळंच सत्य येतं. रणजीतने खरंच साक्षीसोबत लग्न केलंय असा सगळ्यांचा गैरसमज होतो आणि त्यातून आईसाहेब टोकाचं पाऊल उचलतात.

Web Title: Doors will be permanently closed for Ranjit; After realizing the truth, Aisaheb took a big decision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.