'संध्या बिंदणी'ला हे काम करण्याची इच्छा, लक्ष वेधून घेण्यासाठी सतत करतेय असे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 09:24 PM2021-03-02T21:24:58+5:302021-03-02T21:30:05+5:30

'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.

Diya Aur Baati Hum's Deepika Singh Wants To Work In Reality Show | 'संध्या बिंदणी'ला हे काम करण्याची इच्छा, लक्ष वेधून घेण्यासाठी सतत करतेय असे काम

'संध्या बिंदणी'ला हे काम करण्याची इच्छा, लक्ष वेधून घेण्यासाठी सतत करतेय असे काम

googlenewsNext


'दीया और बाती हम' मालिकेतून घराघरात पोहचलेली संध्या बींदणी म्हणजेच दीपिका सिंह सध्या काय करतेय असा प्रश्न पडणा-यांसाठी ती सध्या वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असल्याचे पाहायला मिळतंय.बाळाच्या जन्मानंतर ती वर्कआऊट, डायटींग अशा गोष्टी करताना दिसतेय.ती नेहमी तिने इन्स्टाग्रामवर तिचे व्हिडिओ शेअर करत असते.यामध्ये ती जिममध्ये वर्कआऊट करताना आणि डान्सने वेट लॉस करताना दिसते. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्लिम ट्रीम बॉडी कमावण्यासाठी ती खूप मेहनत करत आहे.दीपिकाला सध्या अनेक मालिकांसाठी ऑफर्स येत असल्यातरी आता तिला मालिकांमध्ये रस नाही तर बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये झळकण्याची इच्छा आहे.


'दिया और बाती हम' ही मालिका 2011 साली छोट्या पडद्यावर दाखल झाली.अल्पावधीतच दिया और बाती हम या मालिकेने रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं होतं.या मालिकेत अभिनेत्री दीपिका सिंह हिने संध्या आणि अभिनेता अनस रशीद याने सूरज ही भूमिका साकारली होती. रसिकांना दीपिका आणि अनसची ही जोडी चांगलीच भावली.राजस्थानच्या बॅकड्रॉपवर रंगणा-या दिया और बाती मालिकेने रेटिंगमध्येही सातत्य ठेवलं होतं.त्यामुळे छोट्या पडद्यावरील हिट मालिका म्हणून या मालिकेची गणना होऊ लागली होती. काही काळानंतर मालिकेने रसिकांचा निरोप घेतला होता.


दीपिका सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे विविध अंदाजातील फोटो व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. नुकताच दीपिकाने रस्त्यामध्ये डान्स करत असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये कलरफूल ड्रेस तिने परिधान केल्याचे पाहायला मिळत आहे. दीपिकाने परिधान केलेला ड्रेस थोडा अतरंगी वाटत असला तरी चाहत्यांना तिचा हा मजेशीर पसंतीस पात्र ठरत आहे.

Web Title: Diya Aur Baati Hum's Deepika Singh Wants To Work In Reality Show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.