Divyanka Tripathi Reveals Struggle Period, Which Cant Be Forgot Even TOday | या कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ
या कारणामुळे दिव्यांका त्रिपाठीला काम मिळणे झाले होते बंद, आजही विसरू शकली नाही तो काळ

आज दिव्यांका त्रिपाठीने टीव्ही इंडस्ट्रीत आपले चांगले प्रस्थ निर्माण केले आहे. प्रत्येक निर्मात्याला दिव्यांकाने आपल्या मालिकेत झळकावे अशी इच्छा असते. तिचे लूक्स आणि तिचा अभिनय यामुळे आज तिचे असंख्य चाहते आहेत. देशातच नाही तर देशाबाहेरही दिव्यांकाचे अनेक चाहते आहेत. मात्र इतकी लोकप्रियता मिळवणे आणि अभिनेत्री म्हणून यशस्वी होणे हे दिव्यांकासाठी इतके सोपे नव्हते. तिलाही इतरांप्रमाणे स्ट्रगल काही चुकले नाही. तिच्या आयुष्यात असाही एक काळ होता ज्याचा विचार केला तरी ती अस्वस्थ होते. याबाबतचा एक किस्सा दिव्यांकाने एका मुलाखतीत सांगितला आहे. 

दिव्यांकाने 'बनू मै तेरी दुल्हन' मालिकेतून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. पहिलीच मालिका आणि त्यात पाठीशी फारसा अनुभव नसल्यामुळे तिला त्यावेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागली. इतकेच नव्हेतर  सेटवर तिच्याशी कोणी बोलायचे नाही. कोणालाच दिव्यांका फारशी आवडायची नाही. इतकेच नव्हे तर प्रोडक्शनच्या काही लोकांनी तिच्याविषयी उलट सुलट चर्चा करत तिचे नाव खराब केले होते. त्यामुळे तिला इतर मालिकांच्या ऑफरही मिळणे बंद झाले होते.

इतकेच नव्हे तर दिव्यांकाही खूप अनप्रोफेशनल असल्याचा शिक्काच तिच्यावर बसला होता. त्यामुळे त्याकाळात तिच्याकडे फारसे काम नव्हते आणि ज्या मालिकेत काम करत होती तिथे चांगले मानधनही मिळत नव्हते. त्यामुळे तो काळ दिव्यांकाठी खूपच कठिण होता. 


Web Title: Divyanka Tripathi Reveals Struggle Period, Which Cant Be Forgot Even TOday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.