ठळक मुद्देये है मोहोब्बते या मालिकेत आलियाची भूमिका साकारणाऱ्या कृष्णा मुखर्जीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे की, ही मालिका जून महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

दिव्यांका त्रिपाठी आणि करण पटेल यांची मुख्य भूमिका असलेली ये है मोहोब्बते ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेच्या कथेने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी ही मालिका प्रेक्षकांची प्रचंड आवडती आहे. या मालिकेच्या फॅन्ससाठी एक वाईट बातमी आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. 

२०१३ मध्ये सुरू झालेल्या ये है मोहोब्बते या मालिकेत प्रेक्षकांना इशिता आणि रमण यांची प्रेमकथा पाहायला मिळाली होती. या मालिकेला सुरुवातीला खूपच छान टिआरपी होता. पण आता या मालिकेचा टिआरपी दिवसेंदिवस ढासळत असून ही मालिका आता संपणार असल्याचे म्हटले जात आहे. ये है मोहोब्बते या मालिकेचा टिआरपी वाढवण्यासाठी या मालिकेच्या कथानकाला काही रंजक वळणं देण्यात आली होती. तसेच या मालिकेत काही नवीन पात्रांचा समावेश करण्यात आला होता. या मालिकेत आदीची भूमिका साकारणारा अभिषेक वर्मा प्रेक्षकांचा आवडता असल्याने त्याला देखील मालिकेत नुकतेच परत आणण्यात आले होते. पण एवढे करूनही या मालिकेच्या टिआरपीत काहीही फरक पडलेला नाहीये.

ही मालिका संपणार अशी चर्चा गेल्या कित्येक महिन्यांपासून असून याबाबत मालिकेच्या टीमने मौन राखणेच पसंत केले होते. ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे का असे या मालिकेत मुख्य भूमिकेत असलेले करण, दिव्यांका आणि अनिता हंसनंदानी यांना थोड्या दिवसांपूर्वी मीडियाने विचारले होते. पण त्यांना प्रोडक्शन हाऊसकडून अशी कोणतीच कल्पना देण्यात आली नसल्याचे त्यांनी त्यावेळी म्हटले होते. मात्र ही मालिका संपणार असल्याचे आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने मीडियाला सांगितले आहे. 

ये है मोहोब्बते या मालिकेत आलियाची भूमिका साकारणाऱ्या कृष्णा मुखर्जीने टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले आहे की, ही मालिका जून महिन्यात प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेचा टिआरपी चांगला असताना देखील ही मालिका का संपवली जात आहे असा प्रश्न मला पडला आहे. 


Web Title: Divyanka Tripathi & Karan Patel’s Yeh Hai Mohabbatein To Go Off Air In June
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.