ठळक मुद्देदिशाचे पती मयुर पंड्याने न्यूज 18शी बोलताना सांगितले की, दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परत येणार का यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिशा वकानी परतणार असल्याचं वृत्त ऐकल्यापासून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. ती मालिकेत कधी आणि कशी एन्ट्री करणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. दया मालिकेत परतणार हे आता मालिकेच्या कथानकावरून देखील आपल्या लक्षात आले आहे. पण आता या मालिकेच्या बाबतीत एक वेगळीच बातमी आली आहे. दिशा वाकानी या मालिकेत कायमची नव्हे तर केवळ एका विशेष भागासाठी दिसणार असल्याचे म्हटले जात आहे. 

दिशा वाकानी सुरुवातीच्या काळात तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेच्या प्रत्येक भागात आपल्याला पाहायला मिळत असे. पण आता या मालिकेसाठी ती खूपच कमी वेळ चित्रीकरण करणार असल्याचे म्हटले जात आहे. दिशाचे पती मयुर पंड्याने न्यूज 18शी बोलताना सांगितले की, दिशा तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेत परत येणार का यावर अद्याप निर्णय झालेला नाहीये. सध्या आमचे मालिकेच्या टीमसोबत बोलणे सुरू असून आमच्या काही मागण्या आम्ही टीमसमोर मांडल्या आहेत. दिशाने नुकतेच चित्रीकरण केले असले तरी ते केवळ काही दृश्यांसाठी आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितले की, आमच्यात सध्या बोलणे सुरू असून यावर काहीतरी तोडगा निघेल अशी आम्हाला खात्री आहे. 

या मालिकेत दिशाची एन्ट्री खूप ग्रॅण्ड होणार आहे. नवरात्रीच्या कार्यक्रमादरम्यान ती एन्ट्री करणार असल्याचे म्हटले जात आहे. खरंतर गोकुळधाम सोसायटी नवरात्रीमधील गरब्यादरम्यान दयाबेनला खूप मिस करत आहेत. जेठालालला त्याची पत्नी दयाची खूप आठवण येते आहे आणि त्यामुळे देवीसमोर म्हणणार आहेत की, दया परत येत नाही तोपर्यंत गरबा खेळणार नाही. या कारणामुळे दयाबेनला परत गोकुळधाम सोसायटीमध्ये आणण्यासाठी सगळेजण प्रयत्न करत आहेत. मात्र त्यांचे प्रयत्न फोल ठरले असून दिशा परतेल याची आशा सगळ्यांनी सोडली आहे. पण यातच आता दयाबेनची एन्ट्री होणार आहे. मालिकेच्या निर्मात्यांनी दयाबेनची एन्ट्री स्पेशल बनवण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले असल्याची चर्चा रंगली आहे.


Web Title: Disha Vakani's Husband Mayur Pandya on Actress' Return to Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.