रात्रीस खेळ चाले ३ च्या दिग्दर्शकांचं अपूर्वा नेमळेकरला उत्तर, म्हणाले नवी शेवंता जुन्या शेवंताच्या तोडीची 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2021 12:13 AM2021-11-27T00:13:08+5:302021-11-27T00:14:05+5:30

Ratris Khel Chale 3: शेवंताचे सुपरहिट झालेले पात्र आणि मालिका सोडण्यामागचे कारण सांगताना Apurva Nemalekar हिने मालिकेतील सहकलाकारांवर तसेच मालिकेचे निर्माते आणि वाहिनीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता रात्रीस खेळ चालेचे दिग्दर्शकांनी उत्तर दिले आहे.

The director of Ratris Khel Chale 3 reply to Apurva Nemalekar | रात्रीस खेळ चाले ३ च्या दिग्दर्शकांचं अपूर्वा नेमळेकरला उत्तर, म्हणाले नवी शेवंता जुन्या शेवंताच्या तोडीची 

रात्रीस खेळ चाले ३ च्या दिग्दर्शकांचं अपूर्वा नेमळेकरला उत्तर, म्हणाले नवी शेवंता जुन्या शेवंताच्या तोडीची 

googlenewsNext

सिंधुदुर्ग - झी मराठी या वाहिनीवरील गाजलेल्या रात्रीस खेळ चाले या मालिकेचा तिसरा हंगाम सध्या सुरू आहे. मात्र या मालिकेतील प्रसिद्ध असे शेवंता हे पात्र साकारणाऱ्या अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतून अचानक माघार घेतल्याने शेवंताच्या चाहत्यांना धक्का बसला होता. दरम्यान, एवढे सुपरहिट झालेले पात्र आणि मालिका सोडण्यामागचे कारण सांगताना अपूर्वा नेमळेकर हिने मालिकेतील सहकलाकारांवर तसेच मालिकेचे निर्माते आणि वाहिनीवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना आता रात्रीस खेळ चालेचे दिग्दर्शक आणि कलाकारांनी उत्तर दिले आहे.

रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेचे चित्रिकरण सुरू असलेल्या सावंतवाडीजवळील आकेरी या गावातील चित्रिकरणस्थळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मालिकेचे दिग्दर्शक राजू सावंत यांनी सांगितले की, रात्रीस खेळ चाले या मालिकेने आम्हा कलाकारांना एक कुटुंब मिळवून दिले आहे. शेवंताची भूमिका करणारी अपूर्वा नेमळेकर ही या मालिकेमधून बाहेर पडल्यानंतर आम्ही या भूमिकेसाठी तिच्याच तोडीच्या नव्या कलाकाराची निवड केली आहे. तसेच तीसुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल, असेही त्यांनी सांगितले.

अपूर्वा नेमळेकर हिने रात्रीस खेळ चाले ३ या मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर तिच्या जागी कृतिका तुळसकर हिची शेवंताच्या भूमिकेसाठी निवड करण्यात आली आहे. रात्रीस खेळ चाले या मालिकेचे पहिले दोन सिझन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यातही दुसऱ्या हंगामातील अण्णा नाईक आणि शेवंता यांची केमेस्ट्री प्रेक्षकांना विशेष आवडली होती. त्यामुळे या मालिकेच्या तिसऱ्या हंगामात काय होईल याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. 

Web Title: The director of Ratris Khel Chale 3 reply to Apurva Nemalekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.