ठळक मुद्दे'कहां हम कहां तुम' या शोमधून दीपिका पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे या मालिकेसाठी दीपिकाने वजन कमी केले आहे

 बिग बॉस सीझन 12 ची विजेती दीपिका कक्कर पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री केली आहे. कहां हम कहां तुम या शोमधून दीपिका पुन्हा छोट्या पडद्याकडे वळली आहे. या मालिकेमध्ये ती खूपच स्टायलिश अंदाजात दिसणार आहे. या मालिकेसाठी दीपिकाने वजन कमी केले आहे. 


नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार दीपिकाने सांगितले की, '' या मालिकेसाठी त्याचा पती शोएबने तिला वजन कमी करण्यासाठी दबाव टाकला होता. दीपिका पुन्हा टिव्हीवर परततेय या गोष्टीचा शोएबला खूप आनंद आहे. त्याने मला सोनाक्षीच्या भूमिकेसाठी वजन कमी करायला सांगितले. शोएबने तिला सांगितले की, बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतर तिचे वजन चांगलेच वाढले आहे. त्यामुळे शोएबने तिच्यावर डाएटसाठी आणि वर्कआऊट करण्यासाठी दबाव टाकला.'' दीपिका आणि तिचा पती शोएबचा सुखी संसार सध्या आहे.      


एकमेकांवर नितांत प्रेम असूनही एकमेकांसाठी वेळ न काढता येणाऱ्या एका दाम्पत्याची कथा या मालिकेत सादर करण्यात आली आहे. यात दीपिका कक्करसोबत करण व्ही. ग्रोव्हर हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.  

दीपिका टीव्हीवरील अभिनेत्रीची, तर करण हृदयरोगतज्ज्ञाची भूमिका साकारणार आहेत. दीपिका मुळची पुण्याची असून तिने 'नीर भरे तेरे नैना' या मालिकेत लक्ष्मीच्या भूमिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. 'ससुराल सिमर का' मालिकेतील तिची सीमाची भूमिका खूप गाजली.


Web Title: Dipika kakar say shoaib forced her to lose weight for new serial
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.