कृष्णा अभिषेक आणि मोना सिंगचे नवे रूप तुम्ही पाहिले का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2017 05:49 AM2017-06-08T05:49:55+5:302017-06-08T11:19:55+5:30

कृष्णा अभिषेक कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी झळकला होती. या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी प्रेक्षकांना खूप आवडली ...

Did you see the new form of Krishna Abhishek and Mona Singh? | कृष्णा अभिषेक आणि मोना सिंगचे नवे रूप तुम्ही पाहिले का?

कृष्णा अभिषेक आणि मोना सिंगचे नवे रूप तुम्ही पाहिले का?

googlenewsNext
ष्णा अभिषेक कॉमेडी नाइट्स बचाओ ताजा या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी झळकला होती. या कार्यक्रमातील त्याची कॉमेडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. कृष्णाने याआधी कॉमेडी सर्कस, कहानी कॉमेडी सर्कस की या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खळखळून हसवले आहे. मोना सिंग तर छोट्या पडद्यावरची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. जस्सी जैसी कोई नही या मालिकेतील तिने साकारलेली जस्सी ही भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली होती. या मालिकेनंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली होती. तसेच झलक दिखला जा, एन्टरटेन्मेंट के लिये कुछ भी करेगा, कॉमेडी नाइट्स बचाओ यांसारख्या कार्यक्रमाचे तिने सूत्रसंचालन केले होते. मोना आणि कृष्णा यांची जोडी कॉमेडी नाईट्स बचाओमध्ये जमली होती. आता ते दोघे पुन्हा एकदा इंडिया बनेगा मंच या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत.
इंडिया बनेगा मंच या कार्यक्रमातील यंदाच्या भागात रितविक धनजानी आणि रवी दुबे देखील पाहायला मिळणार आहेत. रितविक मुंबईतील एका पार्कमध्ये 100 लोकांसोबत फ्लॅश मॉब सादर करणार आहे. तसेच रवी दिल्लीतील कनॉट प्लेसमधील लोकांचे मनोरंजन करणार आहे.
कृष्णा अभिषेक आणि मोना सिंग यंदाच्या भागात प्रेक्षकांना एक वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहेत. कृष्णा एका स्त्रीचे रूप धारण करणार आहे तर मोना प्रेक्षकांना पंजाबी पुरुषाच्या वेशात दिसणार आहे. कृष्णा आणि मोनाचे हे बदललेले रूप पाहून त्यांच्या फॅन्सना नक्कीच आश्चर्याचा धक्का बसणार आहे.
एवढेच नव्हे तर कृष्णा या भागात रवी दुबेसोबत रोमान्स करताना देखील दिसणार आहे. 

Web Title: Did you see the new form of Krishna Abhishek and Mona Singh?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.