ठळक मुद्देलागिरं झालं जी या मालिकेतील कलाकारांना या बाळासोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीये. या मालिकेतील सगळेच कलाकार या बाळासोबत आपला वेळ घालवत आहेत हे या फोटोवरून आपल्या लक्षात येत आहे. 

लागिरं झालं जी या मालिकेत नुकताच शीतल आणि अजिंक्यच्या मुलाचा जन्म झाल्याचे आपल्याला पाहायला मिळाले आहे. आपल्या मुलाच्या जन्मामुळे शीतल खूपच खूश असताना अजिंक्य गायब झाले असल्याचे तिला कळले आहे आणि त्यामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शीतलच्या आयुष्यात आलेल्या या संकटाला न घाबरता तिने धीराने सामोरे जायचे ठरवले आहे. 

लागिरं झालं जी या मालिकेत अजिंक्य आणि शीतल यांच्या छोट्याशा बाळाची नुकतीच एंट्री झाली असून हे बाळ प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. या गोड बाळाची चर्चा सध्या सगळीकडेच आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर या मालिकेतील कलाकार देखील या बाळाच्या प्रेमात पडले आहेत असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण या मालिकेतील कलाकारांना या बाळासोबत फोटो काढण्याचा मोह आवरत नाहीये. या मालिकेतील सगळेच कलाकार या बाळासोबत आपला वेळ घालवत आहेत हे या फोटोवरून आपल्या लक्षात येत आहे. 

''लय असत्याल मनमौजी पण लाखात एक तूच माझा फौजी'' असे म्हणत शीतल आणि अजिंक्यच्या प्रेमकथेने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली होती. पण आता अज्या आणि शीतलीच्या प्रेमकथेवर आधारित असलेली ‘लागिरं झालं जी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. 

शिवानी बावकर आणि नितेश चव्हाण यांच्या जोडीने दीड वर्षांमध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास दाखवण्यात आला होता. अजिंक्य आणि शीतल या व्यक्तिरेखा महाराष्ट्रातील कुटुंबातील एक झाल्या. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले. या मालिकेतील प्रत्येक व्यक्तिरेखा वेगळी असून त्या त्या व्यक्तिरेखेचं विशेष महत्त्व आहे. अजिंक्यचा मित्र राहुल्या, त्याचे मामा-मामी, जिजी, जयडी, भैय्यासाहेब या भूमिका रसिकांमध्ये लोकप्रिय ठरल्या. त्यामुळे ही मालिका निरोप घेणार हे कळल्यापासून या मालिकेच्या फॅन्सना नक्कीच वाईट वाटत आहे. 


Web Title: Did you see lagir jhala ji ajinkya and sheetal son pictures?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.