तुझ्यात जीव रंगला मधील राजलक्ष्मीविषयी जाणून घ्या या खास गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2019 10:55 AM2019-11-03T10:55:22+5:302019-11-03T11:00:25+5:30

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे.

did you know this things about Tujhyat Jeev Rangala rana and anjali daughter? | तुझ्यात जीव रंगला मधील राजलक्ष्मीविषयी जाणून घ्या या खास गोष्टी

तुझ्यात जीव रंगला मधील राजलक्ष्मीविषयी जाणून घ्या या खास गोष्टी

googlenewsNext
ठळक मुद्देतुझ्यात जीव रंगला या मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या या बालकलाकाराचे नाव वाग्मी शेवडे असून तिची ही पहिलीच मालिका आहे. ती सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची साताऱ्याची आहे.

झी मराठीवरील 'तुझ्यात जीव रंगला' या लोकप्रिय मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील व्यक्तिरेखांवर संबंध महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करतात. आता ही मालिका एका नव्या वेळेत प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेवर, यातील पात्रांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांनी नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. ही भूमिका धनश्री काडगावकरने साकारली होती. धनश्रीने याआधी देखील अनेक मालिकांमध्ये काम केले असले तरी या भूमिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली होती.

धनश्रीच्या एक्झिटनंतर मालिकेने ५ वर्षांचा लीप घेतला असून आता या मालिकेत राणा आणि अंजलीची मुलगी राजलक्ष्मी आणि नंदिता व सुरजचा मुलगा युवराज या व्यक्तिरेखांची एंट्री झाली आहे. या मालिकेतील ही दोन्ही चिमुरडी मुले प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत आणि त्यातही राजलक्ष्मी तर प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. तिचे बोलणे हे अगदी राणादासारखे असल्याने प्रेक्षकांना ही मुलगी चांगलीच आवडत आहे. या मुलीबाबत आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.

तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नुकतीच एंट्री झालेल्या या बालकलाकाराचे नाव वाग्मी शेवडे असून तिची ही पहिलीच मालिका आहे. ती सध्या मुंबईत राहात असली तरी ती मुळची साताऱ्याची आहे. तिचे वडील काही वर्षांपूर्वी कामानिमित्त मुंबईत आले आणि ते इथेच स्थायिक झाले. तिच्या वडिलांचे नाव अमेय तर आईचे नाव तेजस्विनी आहे. तिचे वडील एका कंपनीत चांगल्या हुद्द्यावर तिच्या आईला पाककृतीत रस आहे. तिच्या आईच्या म्हणजेच तेजस्विनी यांच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटला आपल्याला वाग्मीचे अनेक फोटो पाहायला मिळतात. तेजस्विनी या खूप चांगल्या जेवण बनवत असून त्या पाककृतीच्या स्पर्धांमध्ये देखील भाग घेतात. वाग्मीला अभिनयाची प्रचंड आवड असून ती शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रमात आवर्जून भाग घेते.

 


 

Web Title: did you know this things about Tujhyat Jeev Rangala rana and anjali daughter?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.