‘देवमाणूस’ वादात ! सरू आजीच्या तोंडची म्हण ठरली कारण ; मेकर्सनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 03:32 PM2021-07-16T15:32:32+5:302021-07-16T15:33:40+5:30

Devmanus : सरु आजीच्या म्हणींनी सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पडतो . या म्हणी सोशल मिडीयावर आजीच्या फोटोंसकट व्हायरल होतात. तूर्तास मात्र सरू आजीच्या तोंडच्या एका संवादामुळं मालिकेवर टीका होत आहे.

Dev Manus Marathi serial controversy did saru aaji use of obscene proverbs | ‘देवमाणूस’ वादात ! सरू आजीच्या तोंडची म्हण ठरली कारण ; मेकर्सनी केला खुलासा

‘देवमाणूस’ वादात ! सरू आजीच्या तोंडची म्हण ठरली कारण ; मेकर्सनी केला खुलासा

googlenewsNext
ठळक मुद्देदेवमाणूस' या मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच भाव खाऊन जातय. आजीला जरी दिसत नसलं तर आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर चांगलेच लोकप्रिय आहेत. 

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘देवमाणूस’ (Devmanus) सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. चांगुलपणाचा बुरखा पांघरून घात करणा-या वृत्तीवर भाष्य करणारी ही मालिका झी मराठीवर आली आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिकाचं नाही तर या मालिकेतील व्यक्तिरेखाही लोकप्रिय झाल्यात. तूर्तास मात्र लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या मालिकेनं एक वाद ओढवून घेतला आहे. अर्थात झी मराठी वाहिनीनं या वादात काहीही तथ्य नसून तो नुसता खोडसाळपणा असल्याचं स्पष्ट केलं आहे.'

आता हा वाद काय तर ‘देवमाणूस’मधील सरू आज्जीच्या (Saru Ajji from Devmanus) तोंडच्या एका म्हणीचा. होय, सरू आजीच्या तोंडच्या एका संवादामुळं मालिकेवर टीका होत आहे. गेल्या 13 जुलैला प्रक्षेपित झालेल्या ‘देवमाणूस’च्या भागात सरू आजीच्या तोंडी एक म्हण दाखवली गेली. 
 ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ अशा आशयाची एक म्हण सरू आजी एका दृश्यात बोलताना दिसली आणि यावरून सोशल मीडियावर वेगळाच ‘राडा’ सुरू झाला. सोशल मीडियावर या दृश्याचा आणि सरू आजीच्या संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल  झाला. या व्हिडीओत ‘आपलीच मोरी आणि आंघोळीला चोरी’ या संवादात अश्लील अपशब्द कानावर पडत असल्याचा दावा नेटकºयांनी केला. यानंतर मालिकेवर आणि वाहिनीवर टीका सुरू झाली.

वाहिनी म्हणते, हा मुद्दाम केलेला खोडसाळपणा...
मालिका व वाहिनीवर टीका सुरू होताच झी मराठी वाहिनीचे प्रमुख निलेश मयेकर यांनी लगेच खुलासा केला.  मालिकेतील संवादात कोणताही अश्लील शब्द न वापरल्याचं त्यांनी स्पष्ट केला. हा खोडसरपणा आहे. वाहिनीचं नाव खराब करण्यासाठी मुद्दाम हा  व्हिडिओ व्हायरल करण्यात आला आहे. त्यात अश्लील शब्द वापरला गेल्याचा दावा केला जातोय. पण यात तथ्य नाही. झी मराठी एक   जबाबदार वाहिनी आहे आणि या नात्यानं आम्ही मालिकेच्या संवादात कोणत्याही अश्लील संवादाचा वापर केलेला नाही. संवादात कधीही चुकूनही कोणता अपशब्द येऊ नये; यासाठी आमची वेगळी टीम कार्यरत असते.   ज्यांच्या तोंडी हा संवाद आहे; त्या  एक ज्येष्ठ अभिनेत्री आहेत. अशाप्रकारचा संवाद त्या स्वत:च चुकूनही बोलणारच नाहीत, असं मयेकर म्हणाले.

कोण आहेत सरू आजी?

देवमाणूस' या मालिकेतील सरु आजीचं कॅरेक्टर हे चांगलच भाव खाऊन जातय. आजीला जरी दिसत नसलं तर आजी वाड्याची काळजी घेते. तिचे संवाद तर चांगलेच लोकप्रिय आहेत.  सरु आजीच्या म्हणींनी सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पडतो . या म्हणी सोशल मिडीयावर आजीच्या फोटोंसकट व्हायरल होतात.
सरु आजीची भूमिका अभिनेत्री रुक्मिणी सुतार यांनी साकारली आहे. या ७० वर्षांच्या आहेत. त्यांनी याआधी अनेक मालिकांमध्ये छोट्या-छोट्या भूमिका साकारल्या आहेत. पण ‘देवमाणूस’ या मालिकेतील सरु आजींच्या भूमिकेमुळं त्या अचानक प्रकाशझोतात आल्या. याआधी त्यांनी मिसेस मुख्यमंत्री, लागीरं झालं जी, दुर्गा यांसारख्या मालिका तर जाऊ द्या ना बाळासाहेब, बघतोस काय मुजरा कर, होम स्वीट होम, पोशिंदा, पहिली शेर दुसरी सव्वाशेर यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. या आजींनी ‘दबंग’ चित्रपटात सलमान खानसोबतही काम केलं आहे.

Web Title: Dev Manus Marathi serial controversy did saru aaji use of obscene proverbs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.