तुम्ही CIDचे फॅन आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे गुडन्युज !

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2019 11:52 AM2019-05-21T11:52:39+5:302019-05-21T11:59:17+5:30

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गतवर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण CIDच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे

Dayanand shetty and aditya srivastava will be seen together in dangal new show | तुम्ही CIDचे फॅन आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे गुडन्युज !

तुम्ही CIDचे फॅन आहात, मग ही बातमी तुमच्यासाठी आहे गुडन्युज !

googlenewsNext
ठळक मुद्देCIDमधील मुख्य तीन पात्रांची पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन होऊ शकतेCID ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली

CID या मालिकेने कित्येक वर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. गतवर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. पण CIDच्या फॅन्ससाठी आमच्याकडे एक खुशखबर आहे. सीआयडी मालिकेसोबतच त्याच्यातील कलाकारांनीही फॅन्सच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, या मालिकेतील मुख्य तीन पात्रांची पुन्हा एकदा टीव्हीवर पुनरागमन होऊ शकते.  हा शो दंगल चॅनलवर दिसू शकतो. ही मालिका पोलिसांवर आधारित असणार आहे. रिपोर्टनुसार यात CIDमध्ये दयाची भूमिका साकारणार दयानंद शेट्टी, अभिजीत म्हणजे आदित्य श्रीवास्तव आणि इंन्स्पेक्टर पूर्वी - अंशा सैय्यद या प्रोजेक्टमध्ये दिसणार आहे. याबाबत अजून या कलाकारांनाकडून कोणतीच अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.  


CID ही मालिका 1998 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आली. जवळपास 21 वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. 27 ऑक्टोबर 2018 ला या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित झाला. CID या मालिकेचा लिम्का बुक रेकॉर्डमध्येही समावेश झाला होता.

ही मालिका आजवर सगळ्यात जास्त वर्षं टिव्हीवर प्रक्षेपित झालेली मालिका आहे.  या मालिकेत दयानंद शेट्टी, शिवाजी साटम, आदेश श्रीवास्तव, दिनेश फडणीस, नरेंद्र गुप्ता, श्रद्धा मुसळे यांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेतील कुछ तो गडबड है, दया तोड दो दरवाजा हा संवाद प्रचंड गाजला होता.  

Web Title: Dayanand shetty and aditya srivastava will be seen together in dangal new show

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.