'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनचे कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 03:40 PM2021-02-04T15:40:55+5:302021-02-04T15:41:25+5:30

दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे.

Dayaben's comeback in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma', did you start shooting? | 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनचे कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात?

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये दयाबेनचे कमबॅक, शूटिंगला केली सुरूवात?

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील सर्व पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. या मालिकेत अभिनेत्री दिशा वाकानीनेदेखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे ती म्हणजे दयाबेनची. या शोमुळे दिशा घराघरात लोकप्रिय झाली. गेल्या काही वर्षांपासून दिशा वाकानी मालिकेतून गायब आहे. तिच्या कमबॅकची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या सोशल मीडियावर दिशाने मालिकेचे चित्रीकरण सुरु केल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

दिशा वकानी नावाच्या एका इन्स्टाग्राम पेजने केलेली पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये दिशा वकानी पुन्हा मालिकेत दिसणार आहे आणि तिने मालिकेचे चित्रीकरण सुरु केले आहे असे म्हटले आहे. ही पोस्ट पाहून चाहत्यांना आनंद झाला आहे. पण अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.


सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टवर कमेंट करत अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. तर काही लोकांनी दिशाला सुनावले आहे. एका यूजरने ‘तू किती दिवस लोकांच्या भावनांशी खेळणार आहेस’ असे म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दया बेन ही माहेरी गेली असल्याचे दाखवण्यात आले होते. पण नुकताच पार पडलेल्या एका भागामध्ये दया बेन लवकरच येणार असल्याची हिंट देण्यात आली आहे. त्यामुळे सोशल मीडियावर दिशाची पुन्हा एण्ट्री होणार या चर्चांना उधाण आले आहे. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे दिशा वकानी मालिकेत कमबॅक करते का, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.

Web Title: Dayaben's comeback in 'Tarak Mehta Ka Ulta Chashma', did you start shooting?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.