जेव्हा या शोच्या स्पर्धकाने त्यांचे पाय धुतले आणि घेतला होता आशीर्वाद, भावूक झाल्या होत्या सरोज खान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2020 12:18 PM2020-07-03T12:18:48+5:302020-07-03T12:23:16+5:30

“एक चांगला शिक्षक मिळणे हा आशिर्वाद असतो असे नेहमी लोक म्हणतात, पण मी नेहमी म्हणते की, असे प्रेमळ आणि कष्टाळू विद्यार्थी मिळणे हा शिक्षकाकरिता आशीर्वाद असतो. आशिष तुझ्यासारखा शिष्य मिळाला हे तर माझे भाग्यच उजळले. प्रत्येक कलाकार हा अतिशय वेगळा असतो अशा शब्दात त्यांनी सर्व स्पर्धकांना आशिर्वाद दिला होता.

Dancing Legend Saroj Khan on the sets of &TV's High Fever | जेव्हा या शोच्या स्पर्धकाने त्यांचे पाय धुतले आणि घेतला होता आशीर्वाद, भावूक झाल्या होत्या सरोज खान

जेव्हा या शोच्या स्पर्धकाने त्यांचे पाय धुतले आणि घेतला होता आशीर्वाद, भावूक झाल्या होत्या सरोज खान

googlenewsNext

हाय फिव्हर...डान्स का नया तेवरमध्ये डान्सिंग लिजंड सरोज खान यांनीउपस्थिती लावली होती.या शोमध्ये ‘लाईफ में पेहली बार’ ही विशेष थीम साजरी करत असताना, हाय फिव्हरमध्ये, मास्टरजी नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रख्यात नृत्य दिग्दर्शिका सरोज खान उपस्थिती लावणार यामुळे सारेच उत्सुक होते. प्रत्येक कलाकाराला डान्सिंग लिजंड सरोज खान यांच्या प्रती असणाऱ्या आदरापोटी आशिष हा स्पर्धक मास्टरजींसह गुरु – शिष्य परंपरेचा मान राखून एक लहान परंपरा निभावणार होता.

 

हाय फिव्हरच्या सेटवर, आपल्या परफॉर्मन्सनंतर मास्टरजींना आशिष आणि ऋतुजा गुरु-शिष्य हे नाते साजरे करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. सरोजजींचे पाय धुवून त्यांचे आशिर्वाद आपल्याला मिळावेत, हे त्याचे स्वप्न होते. तशी विनंतीही आशिषने त्यांना केली. या विनंतीमुळे सरोजजी फारच भावूक झाल्या आणि त्यांनी त्याला परवानगी दिली. ही परंपरा करण्यापूर्वी आशिष म्हणाला, “आज भक्ताला देवाचे दर्शन मिळाले. 

मॅम मी तुमचे एकलव्यासारखे नेहमी अनुकरण केले आहे. माझी पहिली गुरु, माझ्या आईसोबतही मी दरवर्षी ही परंपरा साजरी करतो. प्रत्येक नर्तकाच्या गुरु असणाऱ्या सरोजजी यांच्याबरोबर ही परंपरा साजरी करण्याची संधी यावर्षी देवाने मला दिली आहे. माझ्या आयुष्यातील हा सर्वात अविस्मरणीय क्षण आहे.” त्यानंतर त्याने सरोजजींचे पाय धुतले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. 

त्याच्या या प्रेमामुळे मास्टरजी फारच भावूक झाल्या आणि स्पर्धक आणि परिक्षकांकडून मिळालेल्या प्रेमाचा आदर केला. सरोज यांनी अतिशय भावूक शब्दात म्हटले, “एक चांगला शिक्षक मिळणे हा आशिर्वाद असतो असे नेहमी लोक म्हणतात, पण मी नेहमी म्हणते की, असे प्रेमळ आणि कष्टाळू विद्यार्थी मिळणे हा शिक्षकाकरिता आशीर्वाद असतो. आशिष तुझ्यासारखा शिष्य मिळाला हे तर माझे भाग्यच उजळले. प्रत्येक कलाकार हा अतिशय वेगळा असतो अशा शब्दात त्यांनी सर्व स्पर्धकांना आशिर्वाद दिला होता.

Web Title: Dancing Legend Saroj Khan on the sets of &TV's High Fever

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.