‘डान्स इंडिया डान्स’चा स्पर्धक बिकी दासचा अपघात, कोरोना काळात करत होता फूड डिलिव्हरी बॉयचे काम

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2021 11:37 AM2021-06-06T11:37:56+5:302021-06-06T11:39:20+5:30

बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले.

dance india dance 4 fame biki das meets with road accident work as food delivery boy in lockdown | ‘डान्स इंडिया डान्स’चा स्पर्धक बिकी दासचा अपघात, कोरोना काळात करत होता फूड डिलिव्हरी बॉयचे काम

‘डान्स इंडिया डान्स’चा स्पर्धक बिकी दासचा अपघात, कोरोना काळात करत होता फूड डिलिव्हरी बॉयचे काम

googlenewsNext
ठळक मुद्दे2014 साली बिकीने ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या सीझनमध्ये श्याम यादव हा विजेता होता तर बिकी दास हा सेकेन्ड रनरअप ठरला होता.

‘डान्स इंडिया डान्स’ (Dance India Dance ) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी डान्स शोचा कंटेस्टंट बिकी दास ( Biki Das) याचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. तूर्तास त्याच्यावर कोलकात्याच्या एका रूग्णालयात उपचार सुरू आहेत. बिकी दास हा  ‘डान्स इंडिया डान्स’ च्या 4 थ्या सीझनमध्ये (Dance India Dance 4 ) स्पर्धक म्हणून सहभागी झाला होता. (Dance India Dance 4 fame Biki Das meets with road accident )
बिकी दासचा शुक्रवारी रात्री अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रूग्णालयात भरती करण्यात आले.  बिकी हा एक उत्तम डान्सर होता. पण कोरोना काळात त्याच्यावर फूड डिलिव्हरी करण्याची वेळ आली होती. पोट भरण्यासाठी तो कोलकात्यात फूड डीलिव्हरी बॉयचे काम करत होता.

ई टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री फूड डिलिव्हरी ऑर्डर पोहोचवण्यासाठी जात असतानाच त्याचा अपघात झाला. त्याच्या बाईकला दुस-या बाईकने जोरदार धडक दिली. या अपघातात बिकीच्या बरगड्या तुटल्या. अनेकठिकाणी गंभीर इजा झाली. बिकीची पत्नी संगीताने यासंदर्भात पोलिस तक्रार दाखल केली आहे.

2014 साली बिकीने ‘डान्स इंडिया डान्स’मध्ये स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या सीझनमध्ये श्याम यादव हा विजेता होता तर बिकी दास हा सेकेन्ड रनरअप ठरला होता. बिकी वेगवेगळ्या ठिकाणी पर्फोमन्स करायचा. ‘सुपर डान्सर’मध्ये एका स्पर्धकांचा मेंटॉर म्हणूनही तो दिसला होता. काही दिवसांपूर्वीच ‘डान्स इंडिया डान्स’ला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने शोच्या पहिल्या सीझनचा विजेता व कोरिओग्राफर सलमानने सोशल मीडियावर एक पोस्टही शेअर केली होती.

Web Title: dance india dance 4 fame biki das meets with road accident work as food delivery boy in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.