बिग बॉस मराठीमध्ये या कारणामुळे रंगणार सुशांत शेलार आणि सई लोकूर यांच्यात वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 07:21 AM2018-05-25T07:21:27+5:302018-05-25T12:51:27+5:30

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री या टास्कमधील दोन आरोपी आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ...

Controversy between Sushant Shelar and Sai Lokur, which will be played in Bigg Boss Marathi for this reason | बिग बॉस मराठीमध्ये या कारणामुळे रंगणार सुशांत शेलार आणि सई लोकूर यांच्यात वाद

बिग बॉस मराठीमध्ये या कारणामुळे रंगणार सुशांत शेलार आणि सई लोकूर यांच्यात वाद

googlenewsNext
र्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मर्डर मिस्ट्री या टास्कमधील दोन आरोपी आस्ताद आणि मेघा पाच खून करण्यामध्ये यशस्वी ठरले होते. परंतु गुप्तहेर त्यांच्यावरील आरोप सिद्ध करण्यास अयशस्वी ठरल्यामुळे त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. यावेळेस स्मिता आणि सुशांत यांनी खून कसे झाले याचे दिलेले स्पष्टीकरण वाखाण्यजोगे होते असे बिग बॉसने सांगितले. परंतु पुराव्यांच्या अभावी ते सिद्ध होऊ शकले नाही असे देखील बिग बॉसने सांगितले. तसेच काल रात्री बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळ्याच सदस्यांना एक सरप्राइज मिळाले. बिग बॉसच्या घोषणेनुसार हर्षदा खानविलकरने काल बिग बॉस मराठीचे घर सोडले. ती घरामध्ये फक्त सात दिवसांची पाहुणी होती असे बिग बॉसने सांगताच सगळ्यांना धक्का बसला. यावेळी घरातील सगळेच सदस्य चांगलेच भावूक झाले. हर्षदा खानविलकरने प्रत्येक सदस्याला एक संदेश दिला. “रेशम जिंकावी हीच माझी इच्छा असेल” आणि मी तिला तशा शुभेच्छा देते” असे तिने सांगितले तर काल घरामध्ये “SR” म्हणजे कोण? याचे कोडे उलघडले. बिग बॉसने शर्मिष्ठाचे घरामध्ये स्वागत करताच सदस्यांना आनंद झाला. तेव्हा या नव्या सदस्याच्या येण्याने बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काय काय बदलणार? आज सुशांत आणि मेघामध्ये कोण घराचा नवा कॅप्टन बनणार? कोण कॅप्टनसीच्या टास्कमध्ये बाजी मारणार हे बघणे रंजक असणार आहे. 
शर्मिष्ठा राऊत घरामध्ये आल्यानंतर तिने आपले मत व्यक्त करण्यास सुरुवात केली. तिला आऊ, मेघा आणि सई ज्याप्रकारे खेळत आहेत, ते खूपच आवडते आणि बाहेर देखील हे चांगल्याप्रकारे दाखवले जात आहे असे तिने त्यांना सांगितले. तसेच मेघा आणि सईला संदेश आणि गिफ्ट देखील दिले. ही मैत्री आता पुढे किती टिकणार? कोण कोणाचा साथ देणार? हे लवकरच कळेल. तसेच आज घरामध्ये कॅप्टनसीचा टास्क रंगणार आहे. घरातील सदस्य सर्वानुमताने सुशांत आणि मेघाला कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडणार आहेत. बिग बॉस “हुकमी चौकट” हे कॅप्टनसीचे कार्य घरातील सदस्यांवर सोपवणार आहेत. ज्यामध्ये उमेदवारांच्या सहनशीलतेची कसोटी लागणार आहे. यामध्ये घरातील सदस्यच या उमेदवारांच्या समर्थनाचे कार्य करणार आहेत. टीम मेघा आणि टीम सुशांत अशा दोन टीम असणार आहेत. उमेदवारांनी चौकटीच्या ठोकळ्यावर कोणताही आधार न घेता उभे रहायचे आहे. हे दोन्ही उमेदवार त्यांची जागा टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. तसेच प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्या जागेवरून हटवण्याचा प्रयत्न दुसऱ्या टीममधील समर्थक करणार आहेत. प्रतिस्पर्धी समर्थकांनी दुसऱ्या टीमच्या उमेदवाराला चौकटीच्या कुठल्याही बाजूने खाली उतरण्यास भाग पाडायचे आहे आणि हाच समर्थकांचा उद्देश असणार आहे. या टास्कमध्ये सुशांत आणि सईमध्ये बरीच वादावादी होणार आहे. ज्यामध्ये सुशांत चिडून तिला लायकित राहा असे म्हणणार आहे आणि सई देखील सुशांतला धमकी देऊ नकोस असे म्हणणार आहे. हा वाद कुठल्या टोकाला जाणार? मेघा की सुशांत कोण बनणार बिग बॉस मराठीच्या घराचा नवा कॅप्टन? प्रतिस्पर्धी उमेदवाराला कोणत्या प्रकारे समर्थक त्रास देणार? हे आजच्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

Also Read : ​रेशम टिपणीस आणि राजेश शृंगारपूरे यांच्या नात्याबाबत अखेर त्याच्या पत्नीने सोडले मौन...
 

Web Title: Controversy between Sushant Shelar and Sai Lokur, which will be played in Bigg Boss Marathi for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.