Confirm:कोणी तरी येणार येणार गं...भारती सिंह Pregnant, लवकरच बनणार आई

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:32 PM2021-12-09T14:32:57+5:302021-12-09T14:36:38+5:30

अजून भारती (Bharti Singh) आणि हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) दोघांनीही त्यांची ही गुड न्युज चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही.

Confirm:Bharti Singh Pregnant, Expecting First Baby In 2022, check details here | Confirm:कोणी तरी येणार येणार गं...भारती सिंह Pregnant, लवकरच बनणार आई

Confirm:कोणी तरी येणार येणार गं...भारती सिंह Pregnant, लवकरच बनणार आई

googlenewsNext

कुणी तरी येणार येणार गं…. या गाण्याच्या ओळी सध्या भारती सिंगच्या घरातून ऐकायला मिळत आहेत. लवकरच तिच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. भारती सिंग(Bharti Singh) लवकरच आई बनणार आहे.ती प्रेग्नन्ट असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. रसिकांना खळखळून हसायला लावत त्यांचं तुफान मनोरंजन करणारी कॉमेडी क्वीन भारती सिंहला लग्नानंतर ती गुड न्यूज कधी देणार यावर सतत प्रश्न विचारले जायचे. यावर भारतीही मजेशीर उत्तर देताना दिसायची. पण आता भारती खरोखरच प्रेग्नंट असल्याची बातमी समोर आली आहे. हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार भारती सिंग प्रेग्नंट असल्याचे समजतंय. 


सुरुवातीचे दिवस असल्यामुळे भारतीने आता शूटिंगमधून ब्रेक घेतल्याचेही समजतं. तिने काही महिन्यांसाठी तिचे सगळे शेड्युअल असलेली कामाच्या तारखाही पुढे ढकलल्या आहेत. कामातून ब्रेक घेत आता भारती तिची प्रेग्नंसी एन्जॉय करत आहे. सध्या ती संपूर्णपणे बेड रेस्टवर आहे.स्वतःची काळजी घेता यावी आराम करता यावा म्हणून आता ती घरीच विश्रांती करणार आहे.

नवीन वर्षात २०२२ मध्ये ती बाळाला जन्म देणार आहे. अजून भारती आणि हर्ष लिंबाचिया दोघांनीही त्यांची ही गुड न्युज चाहत्यांसोबत शेअर केलेली नाही. एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत तिने तिच्या प्रेग्नंसीच्या बातमीवर नकारही दिलेला नाहीय, योग्य वेळ येताच चाहत्यांसोबत तिचा आनंद शेअर करणार असल्याचे तिने म्हटले आहे. 

गेल्याच वर्षी २०२० मध्ये ती फॅमिली प्लॅनिंग करत असल्याचे सांगिलते होते. पण कोरोनामुळे तिने तिचे प्लॅनिंग पुढे ढकलले होते. भारती आणि हर्ष 2017 मध्ये लग्नाच्या बंधनात अडकले होते. दोघांनी काही दिवसांपूर्वीच लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा केला होता. दोघांनीही मोठ्या थाटामाटात लग्न केले होते. लग्नाला अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.भारती सोशल मीडियावरही प्रचंड सक्रीय असते. पती हर्ष लिंबाचियासह फोटो शेअर करत कपल गोलही देत असते. दोघांमधली केमिस्ट्री पाहून चाहते त्यांचे भरभरुन कौतुकही करत असतात. 

Web Title: Confirm:Bharti Singh Pregnant, Expecting First Baby In 2022, check details here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.