कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने स्टायलिश फोटोशूट शेअर करत चाहत्यांना दिला धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 07:26 PM2021-03-12T19:26:58+5:302021-03-12T19:31:00+5:30

श्रेयाला खऱ्या अर्थाने लोकप्रियता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामुळे मिळाली.

Comedy queen shreya bugde share a stylish photoshoot | कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने स्टायलिश फोटोशूट शेअर करत चाहत्यांना दिला धक्का !

कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेने स्टायलिश फोटोशूट शेअर करत चाहत्यांना दिला धक्का !

googlenewsNext

श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. श्रेयाने नुकताचे तिचे ग्रीन शर्टमधलं  फोटोशूट शेअर करत सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. यात ती प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. श्रेयाचा हा अंदाज तिच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले आहे. या कार्यक्रमाला अनेक वर्षं झाली असून या कार्यक्रमाची लोकप्रियता थोडी देखील कमी झालेली नाही. या कार्यक्रमाची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून या कार्यक्रमातील सगळेच कलाकार प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. या कार्यक्रमाद्वारे डॉ. निलेश साबळे, भाऊ कदम, कुशल बद्रिके, भारत गणेशपुरे, सागर कारंडे आणि श्रेया बुगडे प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करतात.

श्रेयाने गेल्या काही वर्षांत तिच्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. त्याचसोबत समुद्र या नाटकात ती एका गंभीर भूमिकेत दिसली होती. या नाटकातील तिच्या आणि चिन्मय मांडलेकरच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी प्रचंड कौतुक केले होते.

Web Title: Comedy queen shreya bugde share a stylish photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.