कपिल शर्माने विचारला बायकोला आनंदी ठेवण्याचा मंत्र; वाचा श्री श्रींनी काय दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 10:57 AM2020-05-08T10:57:40+5:302020-05-08T10:59:32+5:30

कपिलने श्री श्री यांना विचारले काही गंभीर तर काही अतिशय मजेदार प्रश्न

comedy king kapil sharma asked guru sri sri ravi shankar such a question he himself could not stop his laughter-ram | कपिल शर्माने विचारला बायकोला आनंदी ठेवण्याचा मंत्र; वाचा श्री श्रींनी काय दिले उत्तर

कपिल शर्माने विचारला बायकोला आनंदी ठेवण्याचा मंत्र; वाचा श्री श्रींनी काय दिले उत्तर

googlenewsNext

लॉकडाऊनमुळे कपिल शर्माचा लोकप्रिय कॉमेडी शोचे शूटींग बंद आहे. पण कपिल सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्यांच्या संपर्कात आहे. गुरुवारी कपिलने आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासोबत एक लाइव्ह सेशन केले. या सेशनमध्ये कपिलने श्री श्री यांना काही गंभीर तर काही अतिशय मजेदार प्रश्न विचारले.
भगवान का असली कॉन्सेप्ट क्या है? असा प्रश्न कपिलने श्री श्री यांना केला. परमेश्वराचा खरा अर्थ काय, हे त्याला विचारायचे होते. काही म्हणतात मंदिरात जा, काही म्हणतात मशिदीत जा, काही म्हणतात चर्चमध्ये जा तर काही म्हणतात निर्सगाकडे जा. पण ख-या अर्थाने परमेश्वर काय आहे? असे कपिलने विचारले. यावर श्री श्रींनी परमेश्वराचा अर्थ सांगितला. त्यांनी सांगितले, परमेश्वर म्हणजे प्रेम, जे तुमच्या मनात आहे. संपूर्ण निसर्ग परमेश्वर आहे. परमेश्वर दिसत नाही, असे लोक म्हणतात. माझ्यामते, त्याच्याशिवाय काहीही नाही.

कुठे गेले ते बालपण, तो आनंद
गुरूदेव, आपल्या बालपणाचा तो आनंद कुठे हरवला? असा प्रश्न कपिलने श्री श्रींना केला. यावर श्री श्रींनी सांगितले, ‘घेण्यातून जो आनंद मिळतो, तो मर्यादीत आहे. पण देण्याचा आनंद अमर्यादीत आहे. तुला जो आनंद हवा तो तुझ्याच आत आहे.’

बायकोला आनंदी ठेवण्याचा काही मंत्र

पत्नी नेहमीसाठी आनंदी राहिल यासाठी काही उपाय आहे का?  असा थेट प्रश्नही कपिलने विचारला. यावर श्री श्री यांनाही हसू आवरले नाही़. सूर्य पश्चिमेकडून उगवला तरच हे शक्य आहे, असे मजेदार यावर उत्तर श्री श्री यांनी दिले. यावर मला तुमचे उत्तर समजले, असे कपिल म्हणाला.

पहाटे उठायचा कंटाळा येतो, काही उपाय?
गुरुदेव मी खूप प्रयत्न करतो़ पण पहाटे उठू शकत नाही. मला रात्री जागायला आवडते. काय हे चुकीचे आहे? यावर काही उपाय आहे? असा प्रश्न कपिलने श्री श्री यांना केला. यावर श्री श्री म्हणाले, यात काहीही अडचण नाही. रचनात्मक कार्य करणारी अनेक माणसं रात्री जागतात. यात काहीही चुकीचे नाही. फक्त डोळे उघडल्यावर थेट धावत सुटू नका. स्वत:ला 10 मिनिटं द्या. ध्यान करा. स्वत:च्या आत झाकून बघा.


 

Web Title: comedy king kapil sharma asked guru sri sri ravi shankar such a question he himself could not stop his laughter-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.