खूप लोक बोलले स्वप्नात जगणं सोड...; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारनं शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 10:20 AM2022-03-30T10:20:07+5:302022-03-30T10:21:23+5:30

Jiv Maza Guntala : मल्हार अर्थात सौरभ चौगुलेनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौरभने त्याच्या स्वप्नांबद्दल लिहिलं आहे.

Colors Marathi serial Jiv Maza Guntala FAME Malhar aka Saorabh Choughule share post | खूप लोक बोलले स्वप्नात जगणं सोड...; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारनं शेअर केली खास पोस्ट

खूप लोक बोलले स्वप्नात जगणं सोड...; ‘जीव माझा गुंतला’ फेम मल्हारनं शेअर केली खास पोस्ट

googlenewsNext

सध्या मराठी मालिकांची फारच चलती आहेत. अनेक मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाल्यात. या मालिकेतील कलाकारही कधी नव्हे इतके लोकप्रिय झालेत. ‘जीव माझा गुंतला’ (Jiv Maza Guntala) ही मालिका अशीच एक अल्पावधीत लोकप्रिय मालिका. मालिका लोकप्रिय झाली आणि मालिकेतील कलाकार घराघरात पोहोचले. याच मालिकेतील मल्हारला तुम्ही ओळखत असालच. होय, आम्ही बोलतोय ती मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता सौरभ चौगुले (Saorabh Choughule) याच्याबद्दल. सध्या याच मल्हारची एक पोस्ट व्हायरल होतेय.

नुकताच कलर्स मराठीचा पुरस्कार सोहळा (Colors Marathi Award 2022)  पार पडला. या सोहळ्यात ‘जीव माझा गुंतला’तील अंतरा व मल्हारच्या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडीचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. या पुरस्कारानंतर मल्हार अर्थात सौरभ चौगुलेनं एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सौरभने त्याच्या स्वप्नांबद्दल लिहिलं आहे.

सौरभ लिहितो...
‘स्वप्न बघा ते पूर्ण होतात. खरंच! खूप लोक बोले स्वप्नात जगणं सोड. Be practical. अभ्यासात, नोकरी सगळ्या गोष्टीत तुलना झाली. स्वतःवर doubt पण आला की काय करतोय मी, खूप अपयश आलं. खूप रिजेकशन आले.
रोज रात्री झोपताना देवाला , नशिबाला खूप कोसलं.सकाळी उठून लक्षात यायचं रात्री पुन्हा तेच स्वप्न पाहिलं.
आणि आज तेच स्वप्न जगतोय. आई बाबांच्या चेहऱ्यावर अभिमान बघतोय. ही त्या स्वप्नाची छोटी सुरवात आहे खूप लांबचा पल्ला गाठायचंय,’असं सौरभने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

कलर्स मराठीवरची ‘जीव माझा गुंतला’ ही मालिका  प्रेक्षकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.   उद्योजक असलेला नायक आणि  साध्या कुटुंबातील रिक्षा चालवणारी नायिका अशी ही मालिकेची कथा प्रेक्षकांना फारच भावली.  मालिकेत अंतरा आणि मल्हार या दोघा हट्टी परंतु तितक्याच संवदेशनशील जोडप्याची कथा दाखवली आहे. 

Web Title: Colors Marathi serial Jiv Maza Guntala FAME Malhar aka Saorabh Choughule share post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.