सौभाग्यनगरला घरफोडी

सौभाग्यनगरला घरफोडी

नाशिकरोड : लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमधील बंद बंगल्याचा कडीकोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी चार लाख रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली.
ठाणे येथे राहणारे मिथुन विश्वनाथ दास यांचा लॅम्परोड सौभाग्यनगर येथील शांतीनिकेतनमध्ये स्वत:चा बंगला आहे. दास बंधू महिना-पंधरा दिवसांत शांतीनिकेतनमधील बंगल्यात येत असतात. मात्र कोरोना लॉकडाऊनमुळे मिथुन दास हे गेल्या ६ जून पासून ४ जुलैपर्यंत महिनाभर शांतीनिकेतनमधील बंगल्यात आले नव्हते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. बेडरूममधील कपाटाचे लॉक तोडून ३ लाख ९६ हजार रु पये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड चोरून नेली. ४ जुलै रोजी मिथुन दास शांतीनिकेतनमधील बंगल्यात आले असता त्यांना घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाचकहो, 'लोकमत CNX Filmy'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatCNXFilmy ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Burglary at Saubhagyanagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.