बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव आलं समोर, 'इंडियन आयडॉल'चा विजेता अभिजीत सावंत करिअरमध्ये का ठरला अपयशी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 03:05 PM2021-05-13T15:05:31+5:302021-05-13T15:06:09+5:30

अभिजीत सावंतने एका मुलाखतीत बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव सांगितले आहे.

Bollywood's shocking reality comes to the fore, why 'Indian Idol' winner Abhijeet Sawant failed in his career | बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव आलं समोर, 'इंडियन आयडॉल'चा विजेता अभिजीत सावंत करिअरमध्ये का ठरला अपयशी

बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव आलं समोर, 'इंडियन आयडॉल'चा विजेता अभिजीत सावंत करिअरमध्ये का ठरला अपयशी

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय सिंगिग रिएलिटी शो इंडियन आयडॉल गेले कित्येक वर्षे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे आणि या शोच्या माध्यमातून बॉलिवूडला चांगले गायक लाभले आहेत. यातील काही गायक पुढे आले तर काही गायब झाले. इंडियन आयडॉलच्या पहिल्या सीझन त्यावेळी खूप लोकप्रिय ठरला होता. या शोचा विजेता ठरला होता मराठमोळा अभिजीत सावंत. या शोमुळे अभिजीतला प्रसिद्धी, पैसा, लोकप्रियता मिळाली होती. त्यानंतर तो एकामागून एक बॉलिवूड गाण्यांची रांगच लावणार अशी चर्चा होती. मात्र काही वर्षांत त्याचे नाव इंडस्ट्रीतून गायब झाले. इतका छान आवाज असताना त्याला बॉलिवूडमध्ये संधी का मिळाली नाही, या प्रश्नाचं उत्तर देताना अभिजीत सावंतने बॉलिवूडचे धक्कादायक वास्तव सांगितले आहे.


बॉलिवूड स्पायला दिलेल्या मुलाखतीत अभिजीत सावंतने त्याच्या करिअरबद्दल सांगितले. तो म्हणाला, “आपली इंडस्ट्री टॅलेंटवर कमी आणि ओळखींवर जास्त काम करते. बहुतांश संगीतकार आपल्या ओळखीच्या गायकांनाच संधी देतात. त्यांचा एक गट असतो अन् त्या गटामध्ये पोहोचणे बाहेरील गायकांसाठी खुप कठीण असतं. माझ्या बाबतीतही तेच घडले.


इंडियन आयडल जिंकल्यावर अभिजीत सावंतचा प्रवास सुरु झाला. मात्र गेल्या १५ वर्षात त्याला अनेकांनी नकार दिला. कारण तो त्यांच्या गटातील गायक नव्हता. रिअलिटी शोमधील कलाकार रातोरात प्रसिद्ध होतात, त्यांचा खुप मोठा फॅन फॉलोअर्स असतो. मात्र त्यांच्यासोबत काम करायला इंडस्ट्रीमधील कलाकार कंफर्टेबल नसतात. त्यामुळे त्यांना म्हणावी तशी संधी मिळत नाही, असे अभिजीतने सांगितले.


सध्या अभिजीत सावंत देश-विदेशात गाण्याचे शो करतो आहे. इंडियन आयडॉलचा किताब जिंकल्यानंतर सोनी वाहिनीने त्याचा म्युझिक अल्बम लॉन्च केला होता. मात्र त्यानंतर त्याला कुठल्याच चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याने चित्रपटांचा नाद सोडून आता लाइव्ह शोवर लक्ष केंद्रित केले आहे.

Web Title: Bollywood's shocking reality comes to the fore, why 'Indian Idol' winner Abhijeet Sawant failed in his career

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.