बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धकांना पाहायला मिळणार कार्यक्रमातील या काही जुन्या क्लिपिंग्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 02:17 PM2018-07-13T14:17:55+5:302018-07-13T14:19:13+5:30

बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे.

bigg boss will show old clippings to bigg boss marathi contestants | बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धकांना पाहायला मिळणार कार्यक्रमातील या काही जुन्या क्लिपिंग्स

बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धकांना पाहायला मिळणार कार्यक्रमातील या काही जुन्या क्लिपिंग्स

googlenewsNext

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून बिग बॉसचा वाढदिवस साजरा करण्याचे हटके कार्य सुरू आहे. रिटर्न गिफ्ट म्हणून सदस्यांना “तिकीट टू फिनाले” मिळणार असे बिग बॉसने घोषित केले आहे. आता या रेस मध्ये कोणाला “तिकीट टू फिनाले” मिळणार हे बघणे रंजक असणार आहे. याचाच अर्थ ज्याला हे तिकीट मिळणार तो थेट महाअंतिम फेरीमध्ये पोहचणार आहे. काल मेघा “तिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद झाली. आज टास्कमध्ये काय होणार? “तिकीट टू फिनाले” या रेसमधून कोण बाद होणार? कोणाला “तिकीट टू फिनाले” मिळणार? तसेच आज कोणते अतिथी बिग बॉस मराठीच्या घरामध्ये येणार? हे बघायला मिळणार आहे.
बिग बॉसच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धेच्या या टप्प्यावर घरातील इतर सदस्य आपल्याविषयी मागे काय बोलतात याची झलक घरातल्या प्रत्येक सदस्याला बघण्याची संधी बिग बॉस आज देणार आहेत. पुष्कर, सई आणि रेशमला मेघा त्यांच्यामागे काय बोलली हे दाखविण्यात येणार आहे. हे बघितल्यानंतर घरातील सदस्य मेघाच्या विरोधात गेले आणि सगळ्यांनीच तिला जाब विचारायला सुरुवात केली. रेशमने मेघाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की, ती जे काही पर्सनल तिच्याबद्दल बोलली ते बोलायला नको होतं. तसेच सईने शर्मिष्ठाला आणि आस्तादने मेघाला जाब विचारला. पुष्कर आणि सई मेघावर काल बरेच नाराज झालेले दिसून आले. मेघा जे काही पुष्करबद्दल बोलली, त्यावरून पुष्कर आणि सईने देखील मेघाचे नाव “तिकीट टू फिनाले” या रेस मधून बाद होण्यासाठी घेतले. 
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सदस्यांच्या प्रवासामध्ये स्पर्धा, मैत्री, प्रेम, धोका, अशा अनेक रंजक गोष्टी घडल्या आहेत. प्रत्येकाने स्वत:भोवती समज–गैरसमज याची चौकट आखून घेतली आहे. नेमकी हीच चौकट मोडून काढत स्वत:वर विजय मिळविण्यासाठी बिग बॉस आज सदस्यांवर बॉक्स–अनबॉक्स हे कार्य सोपवणार आहेत. या कार्यामध्ये नक्की काय होणार आहे? हे बघणे रंजक असणार आहे. ज्यामध्ये मेघा, आस्ताद आणि रेशम यांना मिळून बॉक्स मध्ये असलेले शर्मिष्ठा, पुष्कर, स्मिता आणि सई यांना त्या बॉक्स मधून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत. तसेच काल झालेल्या चर्चेवरून आणि वादावरून शर्मिष्ठा आणि मेघा मध्ये आज बरीच चर्चा होणार आहे ती काय आहे हे आज बघायला विसरू नका.  

Web Title: bigg boss will show old clippings to bigg boss marathi contestants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.