Bigg Boss Marathi 2 : चक्क बिग बॉसनेच 'या' सदस्याला केले घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 04:40 PM2019-08-14T16:40:46+5:302019-08-14T16:56:57+5:30

 बिग बॉसच्या घरात आजवर अनेकवेळा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्या ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना घरामध्ये नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट केले.

Bigg boss nominated shiv thakre for this week | Bigg Boss Marathi 2 : चक्क बिग बॉसनेच 'या' सदस्याला केले घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

Bigg Boss Marathi 2 : चक्क बिग बॉसनेच 'या' सदस्याला केले घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेट

googlenewsNext

 बिग बॉस मराठीच्या कालच्या भागामध्ये नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. बिग बॉसच्या घरात आजवर अनेकवेळा नॉमिनेशन प्रक्रिया पार पडल्या ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना घरामध्ये नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट केले. पहिल्या दिवसापासूनच घरातील सदस्य या पर्वाचे विजेता पद मिळविण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत. घरातील सदस्य त्यांच्यासोबत काही सदस्यांना अंतिम फेरीमध्ये बघत आहेत.  त्यामुळेच बिग बॉस यांनी काल वेगळ्या प्रकारे नॉमिनेशन प्रक्रिया पार पडली. ज्यामध्ये सदस्यांनी त्यांना नको असलेल्या सदस्यांना नॉमिनेट न करता त्यांच्या आवडत्या सदस्यांना नॉमिनेशनमधून वाचवायचे होते. या टास्कमध्ये किशोरी शहाणे घराच्या कॅप्टन असल्याने आणि शिव बिग बॉसद्वारे नॉमिनेट असल्याने सदस्य यांची नावे घेऊ शकले नाही पण त्यांनी मात्र सदस्यांना सेफ केले.

काल पार पडलेल्या या टास्कमध्ये वीणा, आरोह, नेहा, शिवानी सेफ झाले तर कमी मत मिळाल्याने हीना या आठवड्यातिल घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये नॉमिनेट झाली. बघूया या आठवड्यामध्ये कोण घराबाहेर जाईल आणि कोणाला प्रेक्षकांची मते वाचवतील. 

Web Title: Bigg boss nominated shiv thakre for this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.