Bigg Boss Marathi Season 2 finale : शिवानीचे चाहते घराबाहेर साजरा करतायेत तिचा बर्थ डे, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 12:31 PM2019-08-28T12:31:32+5:302019-08-28T12:32:41+5:30

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्य शिवानीचा आज वाढदिवस आहे.  बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत.

Bigg Boss Marathi Season 2 finale: Shivani fans celebrate her birthday outside house | Bigg Boss Marathi Season 2 finale : शिवानीचे चाहते घराबाहेर साजरा करतायेत तिचा बर्थ डे, वाचा सविस्तर

Bigg Boss Marathi Season 2 finale : शिवानीचे चाहते घराबाहेर साजरा करतायेत तिचा बर्थ डे, वाचा सविस्तर

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वातील सदस्य शिवानीचा आज वाढदिवस आहे.  बर्थडेच्या दिवशी शिवानी बिग बॉसच्या घरात असली तरी तिचे चाहते महाराष्ट्रभर तिचा वाढदिवस दणक्यात साजरा करत आहेत. फॅन्सचं शिवानीवर असलेलं प्रेम थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या शिवानीचा वाढदिवस स्पेशल व्हावा म्हणून खूप नाविन्यपूर्ण पद्धतींनी चाहत्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातल्या केगाव मध्ये राहणारा शिवानीचा जबरा फॅन निनाद म्हात्रे जो गाडीवर ‘शिवानी स्टाईल’ स्टिकर लावल्यामुळे चर्चेत आला होता. त्याने शिवानीचा वाढदिवस स्पेशल करण्यासाठी परत एकदा खूप मेहनत घेतली आहे. तो राहत असलेल्या गावात कुठल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नाहीयेत. तरी शिवानीसाठी खास शहरात जाऊन वाढदिवसाच्या  दिवशी सकाळी निनाद केक, ग्रिटिंग कार्ड घेऊन आला. त्याने शिवानीसाठी खास पत्र लिहिलंय. वाढदिवसाचा आनंद केक कापून साजरा केल्यावर निनाद म्हणाला, “मी शिवानी सुर्वेचा खूप मोठा चाहता आहे. तिच्या प्रेमापोटीच मी माझ्यासारख्या चाहत्यांचा शिवानीयन्स हा ग्रुप बनवला आहे. बिग बॉस मराठी सीजन २ची ट्रॉफी शिवानीनेच जिंकावी अशीआम्हा सर्व चाहत्यांची इच्छा आहे. ती बिग बॉस जिंकल्यावर तिचा ट्रॉफी हातात घेतलेला मोठा फोटो मी माझ्या घराच्या भिंतींवर लावणार आहे. तिला वाढदिवसासाठी आणि ट्रॉफी जिंकण्यासाठी आम्हा सर्व चाहत्यांकडून शुभेच्छा. ”

साताऱ्यात राहणाऱ्या आसावरी कर्वेने आपल्या लहान मुली आणि पतीसह थेट कास पठारावर जाऊन शिवानीच्या वाढदिवसानिमीत्त केक कापला आहे. आसावरी म्हणाली, “ शिवानी बिग बॉसची ट्रॉफी तू जिंकून ये. तू जिंकावीस म्हणून मी देवाकडे प्रार्थना करतेय. आम्ही सातारकर तू ट्रॉफी घेऊन येण्याची वाट पाहत आहेत. मला पूर्ण खात्री आहे कि बिग बॉसची विजेता तूच होणार आहेस.”

ट्विटरवर #ShivaniSurveDeservesToWin हा हॅशटॅग सध्या चांगलाच ट्रेंड होतोय. त्यांची आवडती शिवानी बिग बॉस मराठीचा सीजन २ जिंकावी म्हणून चाहते प्रयत्नशील आहेत. 

Web Title: Bigg Boss Marathi Season 2 finale: Shivani fans celebrate her birthday outside house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.