Bigg boss marathi updates: बिग बॉसने दिलेल्या आदेशामुळे विकास- गायत्रीमध्ये होणार भांडण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2021 03:30 PM2021-11-24T15:30:00+5:302021-11-24T15:30:00+5:30

Bigg boss marathi updates: सध्या बिग बॉसच्या घरात 'म्हावऱ्याचा लागलाय नाद' हे नवीन साप्ताहिक कार्य सुरु आहे. या कार्यातही अनेक स्पर्धकांमध्ये शाब्दिक वाद झाले.

bigg boss marathi house bigg boss gave new task for celebs |  Bigg boss marathi updates: बिग बॉसने दिलेल्या आदेशामुळे विकास- गायत्रीमध्ये होणार भांडण

 Bigg boss marathi updates: बिग बॉसने दिलेल्या आदेशामुळे विकास- गायत्रीमध्ये होणार भांडण

googlenewsNext

'बिग बॉस मराठी'च्या (bigg boss marathi) घरात दररोज स्पर्धकांमध्ये वेगवेगळ्या कारणांवरुन वाद रंगत असतात. सध्या बिग बॉसच्या घरात 'म्हावऱ्याचा लागलाय नाद' हे नवीन साप्ताहिक कार्य सुरु आहे. या कार्यातही अनेक स्पर्धकांमध्ये शाब्दिक वाद झाले. मात्र, आता विकास आणि गायत्री यांच्यात कडाक्याचं भांडण झाल्याचं दिसून येत आहे. हे भांडण एका अमूल्य मोत्याच्या किंमतीवरुन होत असल्याचं सांगण्यात येत आहे. 

'म्हावऱ्याचा लागलाय नाद' या कार्याच्या शेवटी घरातील दोन सदस्य कॅप्टनसीसाठी उमेदवार म्हणून निवडले जाणार आहेत. परंतु, हा टास्क पूर्णत्वास जाण्यापूर्वीच घरात वादविवाद सुरु झाले आहेत. आज खेळात एक ट्विस्ट येणार असून तो बिग बॉस सांगणार आहेत. यावरुनच गायत्री आणि विकासमध्ये वादविवाद होणार आहेत.
 
समुद्रातून मासे पकडताना जाळ्यात मोतीही सापडले आहेत. या एका अमूल्य मोतीची किंमत आहे ५० मास्यांएवढी..., असं बिग बॉस सांगतात. त्यावरुन गायत्री- विकासमध्ये वाद होतो.

दरम्यान, विकास पाटील तुम्ही वरतून घेतला आहे... मी तो मोती धरणार नाही मोजताना, असं गायत्री म्हणते. त्यावरुन या दोघांमध्ये वाद सुरु होतो. आता हा वाद कुठपर्यंत जाणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 

Web Title: bigg boss marathi house bigg boss gave new task for celebs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.