Bigg Boss Marathi 3 : मीरा माझी ब्रेड-बटर, तू नसती तर मी काय केलं असतं? महेश मांजरेकर असं का म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 04:03 PM2021-11-28T16:03:56+5:302021-11-28T16:05:08+5:30

Bigg Boss Marathi 3 Chavadi : मीराची ओळख करून देताना महेश मांजरेकर काय म्हणाले?

Bigg Boss Marathi 3 Mira Jagganath is my bread-butter, what would I have done without you? Why did Mahesh Manjrekar say that? | Bigg Boss Marathi 3 : मीरा माझी ब्रेड-बटर, तू नसती तर मी काय केलं असतं? महेश मांजरेकर असं का म्हणाले?

Bigg Boss Marathi 3 : मीरा माझी ब्रेड-बटर, तू नसती तर मी काय केलं असतं? महेश मांजरेकर असं का म्हणाले?

googlenewsNext

बिग बॉस मराठी 3’  (Bigg Boss Marathi 3) हा शो आणि शनिवार-रविवारची चावडी म्हणजे नुसती धम्माल. आज रात्री भाईजान सलमान खान ‘बिग बॉस मराठी 3’च्या चावडीवर येतोय. निमित्त अर्थातच ‘अंतिम- द फायनल ट्रूथ’ या सिनेमाच्या प्रमोशनचं. भाईजानसोबत आयुष शर्माही ‘बिग बॉस मराठी 3’मध्ये हजेरी लावतोय. तासाभरापूर्वी याचा एक प्रोमो कलर्स मराठीनं शेअर केला आहे. यात महेश मांजरेकर  (Mahesh Manjrekar) मीरा जगन्नाथ  (Mira Jagganath ) हिची आयुषसोबत ओळख करून देत आहेत.
‘ही माझी सर्वात आवडती आहे. हिचं नाव आहे मीरा. मीरा ना इथे माझी ब्रेड बटर ब्रेड बटर आहे. इतकी धम्माल करते ना, अर्थात पॉझिटीव्ह नाही तर निगेटीव्ह. शनिवारी सगळ्यांत ओरडा ही खाते आणि मग रडते. तू नसतीस तर मी काय केलं असतं मीरा, असं मी तिला म्हणतो,’अशा शब्दांत मांजरेकर मीराची ओळख करून देतात.
यावर आयुष मीराला म्हणतो, बघ, तू आणि मी सारख्याच स्थितीत आहोत. मी पण यांचा खूप ओरडा खाल्ला आहे. पण मी एक गोष्ट नोट केली, मांजरेकर सर त्यांच्यावरच जास्त रागावतात, ज्यांच्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. आयुषचं हे शब्द ऐकून अगदी बरोबर, असं मीरा म्हणते.

सगळीकडे बिग बॉस बनू नकोस
शनिवारी रंगलेल्या चावडीवरही महेश मांजरेकरांनी मीराला सुनावलं होतं. मीरा व गायत्री या दोघींमध्ये या आठवड्यांत चांगलाच वाद झाला होता. मांजरेकर यांनी या  भांडणाविषयी प्रश्न विचारला. या चर्चेदरम्यान मीरा मध्येच काहीतरी बोलायला गेली असता, मांजरेकरांनी तिला चांगल्याच कानपिचक्या दिल्या.
सगळीकडे बिग बॉस बनू नकोस, मी नसताना बन. मला राग येतो अशा शब्दांत मांजरेकरांनी मीराला सुनावलं.
याआधीही झालेल्या चावडीच्या कार्यक्रमात महेश मांजरेकर यांनी मीराची चांगलीच शाळा घेतली होती.  याच आठवड्यात विकास पाटीलसोबत खेळताना झालेल्या भांडणावरुनही मांजरेकरांनी मीराची कानउघडणी केली होती.
 

Web Title: Bigg Boss Marathi 3 Mira Jagganath is my bread-butter, what would I have done without you? Why did Mahesh Manjrekar say that?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.