Bigg Boss Marathi 3 Episodes, 20 Oct: घरातील या सदस्यांना आजीने दिली शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 11:00 AM2021-10-20T11:00:50+5:302021-10-20T11:01:13+5:30

Bigg Boss Marathi 3 : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सध्या चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे कॅप्टन्सी कार्य सुरू आहे.

Bigg Boss Marathi 3 Episodes, 20 Oct: Grandmother punished these members of the family | Bigg Boss Marathi 3 Episodes, 20 Oct: घरातील या सदस्यांना आजीने दिली शिक्षा

Bigg Boss Marathi 3 Episodes, 20 Oct: घरातील या सदस्यांना आजीने दिली शिक्षा

googlenewsNext

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू आहे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक हे कॅप्टन्सी कार्य. ज्याला काल सुरूवात झाली. ज्यामध्ये एका टीममधील सदस्य घरी परत जाणारी म्हातारी असतील आणि दुसर्‍या टीममधील सदस्य त्यांना थांबवणारे प्राणी असतील. प्राणी बनलेल्या सदस्यांनी भोपणे गार्डन एरियामध्ये लपवून ठेवायचे आहेत, तर म्हातारी बनलेल्या टीमने ते शोधाचे आहेत.या प्रकियेमध्ये बाद न झालेली व्यक्ती कॅप्टन पदाची उमेदवार ठरणार आहे. 

टीम A मध्ये जय, उत्कर्ष, गायत्री, स्नेहा, संतोष आणि विकास. टीम B मध्ये विशाल, आदिश, सोनाली, मीनल, आविष्कार आणि मीनल. टीम B मधील सदस्यांमध्ये मीरा ठरली कॅप्टन पदाची पहिली उमेदवार. बघूया आजच्या भागामध्ये काय होते. आजींनी आज सदस्यांना सांगितले की, मी सांगितल्याप्रमाणे जो जिंकेल त्याला खाऊ आणि जो हरेल त्याला शिक्षा देणार. त्यामुळे कॅप्टन पदाच्या उमेदवारसाठी आजींनी दिले बेसनाचे लाडू. हे कार्य चातुर्य आणि चपळाईने पूर्ण करायचे होते, ते सदस्यांना जमले नाही त्यामुळे जे उमेदवार झाले नाहीत त्यांची चपळाई वाढावी म्हणून त्यांनी २५ उठाबशा काढायला आजींनी सांगितले.
आज टीम A मधून कोणता सदस्य बनतो कॅप्टन पदाचा दूसरा उमेदवार हे समजेल. 

आदिश आणि सोनालीमध्ये झाले वाद
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये वादाला सुरूवात झाली की सदस्य थांबायचे नावच नाही घेत. पण, किचन एरियामध्ये स्वयंपाक बनवताना असो वा जेवताना असो भांडण करू नका,वाद करू नका, शक्यतो ते टाळा असे अनेकवेळा सांगून देखील सदस्य काही सुधारायचे नाव घेत नाहीत. शब्दाला शब्द वाढत जातो आणि वाद अजून अजून वाढतो. असेच काहीसे आज आदिश आणि सोनालीच्या बाबतीत होणार आहे. काल सोनालीचे भात वाफण्यावरून तृप्तीताईंशी वाद झाला आणि आज चपाती बनवण्यावरून आदिशसोबत वाद होणार आहे.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Episodes, 20 Oct: Grandmother punished these members of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.