Bigg Boss Marathi 3: तू मला व्हिलन ठरवतेस..., विशाल सोनालीबद्दल काय म्हणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2021 11:14 AM2021-11-28T11:14:49+5:302021-11-28T11:15:16+5:30

Bigg Boss Marathi 3 Chavadi: बिग बॉस मराठीचे दोन प्रोमो समोर आले आहेत. यात मांजरेकर सोनाली व विशालला त्यांच्यात नेमकं काय घडलं? असं विचारत आहेत.

Bigg Boss Marathi 3 Chavadi: Vishhal Nikam And Sonali Patil Get An Earful From Mahesh Manjrekar | Bigg Boss Marathi 3: तू मला व्हिलन ठरवतेस..., विशाल सोनालीबद्दल काय म्हणाला?

Bigg Boss Marathi 3: तू मला व्हिलन ठरवतेस..., विशाल सोनालीबद्दल काय म्हणाला?

googlenewsNext

बिग बॉस मराठी 3’च्या (Bigg Boss Marathi 3) चावडीवर काय काय होणार, याची उत्सुकता असतेच. काल शनिवारी चावडीवर नेहमीप्रमाणे ‘शाळा’ भरली. होय, महेश मांजरेकरांनी गायत्री दातार आणि मीरा जगन्नाथचा नेहमीसारखा क्लास घेतला. शिवाय सोनाली पाटील (Sonali Patil) हिच्यावरही ते बरसले. विशाल  (Vishhal Nikam) व सोनालीचे रूसवेफुगवे पाहून मांजरेकरांनी त्यांना कडक शब्दांत जाब विचारला.
बिग बॉस मराठीचे दोन प्रोमो समोर आले आहेत. यात मांजरेकर सोनाली व विशालला त्यांच्यात नेमकं काय घडलं? असं विचारत आहेत.

विशाल सोनालीच्या तक्रारी सांगताना ती मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करतं असल्याचा आरोप करतो. ‘सोनाली दिसते तशी अजिबात नाहीये. ती सतत मला व्हिलन ठरवण्याचा प्रयत्न करत आहे. मला बोलायचं नाहीये, पण तू मला व्हिलन ठरवतेय, म्हणून मला बोलावं लागतंय,’असं विशाल म्हणतो. सोनाली त्याला मध्येच टोकते आणि असं काहीही नाहीये. मी तुला व्हिलन ठरवलेलं नाही, असं म्हणते. अन्य एका प्रोमात, तू माईक सोडून माझ्या कानात काय बोललीस? हे तू सांगणार कि मी सांगू? असं म्हणते. यावर काही गोष्टी आपण कॅमे-यापुढे नाही बोलू शकत, असं सोनाली म्हणते. विशालने यानंतर विशाल बोलत असताना सोनाली मध्येच बोलते आणि तिच्या अशा वागण्यानं मांजरेकर चिडतात.
तुझा प्रॉब्लेम आहे हं सोनाली. तुला फक्त बोलायचं असतं. तुला बाहेर काढून तिकडून..., अशा शब्दांत मांजरेकर यांनी सोनालीला झापलं.
  या प्रोमोमध्ये सोनाली डोक्याला हात लावून प्रचंड रडताना दिसत आहे. या दोघांमध्ये असं नेमकं काय घडलं कि त्यांना चावडीवर एकेमकांविरुद्ध उभं केलं, हे आजच्या भागातच आपल्याला कळेल.  

Web Title: Bigg Boss Marathi 3 Chavadi: Vishhal Nikam And Sonali Patil Get An Earful From Mahesh Manjrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.