बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांचा नुकताच निरोप घेतला आहे. यंदाच्या सीझनचे विजतेपद शिव ठाकरेनं पटकावलं आहे. त्याला या कार्यक्रमाची ट्रॉफी आणि १७ लाख रुपये मिळाले आहेत. शिव हाच बिग बॉस मराठी २ या कार्यक्रमाचा विजेता ठरेल असा अंदाज कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासूनच लावला जात होता. शिवला मिळालेल्या या यशामुळे तो चांगलाच खूश असून आता भविष्यात या पैशांचा कशाप्रकारे उपयोग करायचा हे देखील त्याने ठरवले आहे. 

बिग बॉसच्या घरात असताना शिव आणि वीणा जगताप यांच्या प्रेमकथेची देखील चांगलीच चर्चा झाली होती. आता घराबाहेर पडल्यानंतरही त्यांच्यातील प्रेम कायम असल्याचं पहायला मिळतंय. वीणाच्या कालच्या इंस्टाग्रामवरील एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. तिने त्या दोघांचा कारमधील एक फोटो शेअर करत लिहिले की, गुरूवारी रात्री ८.३० वाजता लाइव्ह येणार आहे. मी शिवला अ‍ॅडव्हान्समध्ये बर्थडे सरप्राईज देणार आहे आणि त्यासाठी त्याला मी घेऊन चालले आहे. सरप्राईज देताना लाइव्ह येऊ आम्ही.


शिव व वीणाचे चाहते वीणा काय सरप्राईज देणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक होते. शिवने वीणाने काय सरप्राईज दिलं आहे हे त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर सांगितलं आहे. त्यात त्याने त्या दोघांचा फोटो शेअर केला आहे. या फोटो पाहून समजतंय की वीणाने शिवच्या नावाचा टॅटू तिच्या हातावर कोरला आहे. या सरप्राईजचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून शिवने लिहिलं की, आपल्या राणीचं  अ‍ॅडव्हान्समध्ये बर्थडे गिफ्ट. आईशप्पथ हे तर आभाळापेक्षा पण मोठे गिफ्ट. या पेक्षा मोठं काहीच नाही मेरी जान. कसा वाटला टॅटू तुम्हाला असंही शिवनं या पोस्टमध्ये विचारलं आहे.


शिव व वीणा या घरातून बाहेर पडल्यावर लग्न करणार असल्याचे त्यांनी बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेत कबूल देखील केले होते.

आता ते दोघे लग्न करणार का हे जाणून घेण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.

Web Title: Bigg Boss Marathi 2:Veena Jagtap gave advanced birthday gift to Shiv Thakare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.