बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची तर अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात आलं पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2019 02:04 PM2019-05-30T14:04:07+5:302019-05-30T14:04:37+5:30

अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे.

Bigg Boss Marathi 2: Veena-Shivani's fight and Abhijit Bichukale cried | बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची तर अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात आलं पाणी

बिग बॉस मराठी २ : वीणा-शिवानीमध्ये बाचाबाची तर अभिजित बिचुकलेंच्या डोळ्यात आलं पाणी

googlenewsNext


अनेक लोक एकत्र आले की भांड्याला भांडं लागणारच, शब्दाला शब्द लागणारच आणि गैरसमज होणारच... त्यात बिग बॉसचे घर म्हटले की हे स्वाभाविकच आहे. कारण वेगवेगळ्या क्षेत्रातील १५ कलाकार एकत्र आले म्हणजे एकमेकांचा स्वभाव समजणे, त्यांच्या सवयी समजून घ्यायला वेळ लागतोच. मराठी टेलिव्हिजनवरील दोन लोकप्रिय अभिनेत्री राधा म्हणजेच वीणा जगताप आणि शिवानी सुर्वे यांचे घरामध्ये तसे चांगले जमत होते. पण आता या दोघींमध्ये वाद होताना दिसणार आहे. आणि हा वाद देखील अभिजित बिचुकले यांच्यावरूनच.


“मला नको सांगूस कसं बोलायचं” असं शिवानीच म्हणणे आहे तर वीणाचा मुद्दा आहे किचनमध्ये आरडाओरडा नको. आता नक्की काय झालं ? वाद मिटणार का ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. बिग बॉस मराठी सीझन २ सुरु झाल्यापासून अभिजित बिचुकले हे नाव चर्चेत आहे. पण अभिजित केळकर याच्याशी बोलताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी का आले ? त्यांनी कोणत्या गोष्टी सांगितल्या या दरम्यान? हे आजच्या भागामध्ये कळेल.


दिगंबर नाईक यांनी सुंदर कविता सादर केली. “रत्नागिरी,देवगड, कणकवली कट्टा, मालवण, राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं भरून येई उर” अशा शब्दांत त्यांनी गाण्याची सुरुवात केली आणि याचबरोबर कोकणचे कौतुक आणि वर्णन त्यांनी खूप सुंदररीत्या शब्दांत केले. याचबरोबर त्यांनी गाऱ्हाणे देखील सादर केले ज्याला घरातील बाकीच्या सदस्यांनी देखील साथ दिली.


अजून या घरामध्ये काय काय घडेल ? काय गमतीजमती घडतील ? कोणाची मैत्री होईल ? तर कोणाचे वाद होतील ?

हे जाणून घेण्यासाठी बघा बिग बॉस मराठी सिझन २ रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Web Title: Bigg Boss Marathi 2: Veena-Shivani's fight and Abhijit Bichukale cried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.