ठळक मुद्देमी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. कोणाच्या तरी कानाखाली मार... नियमांचं उल्लंघन कर... म्हणजे बिग बॉसच्या घरातून तुला आपोआप बाहेर काढले जाईल.

बिग बॉस मराठी २ चा कालचा भाग हा खूप खास होता. सलमान खानने उपस्थित राहून या शोची शोभा वाढवल्‍याने अनेक स्‍पर्धकांचे स्‍वप्‍न सत्‍यात अवतरले. सलमान खान या आठवड्याच्या 'वीकेण्‍डचा डाव'च्या एपिसोडमध्‍ये महेश मांजरेकर यांच्यासोबत सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसला. त्यामुळे सगळेच स्पर्धक प्रचंड खूश झाले होते. 

बिग बॉस मराठीच्या स्पर्धकांना बिग बॉसने दिलेले सरप्राइज प्रचंड आवडलं असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. लहानपणापासून सलमान खानची चाहती असलेल्या शिवानी सुर्वेसाठी तर सलमान खानला याची देही याची डोळा पाहणं आणि त्याच्यासोबत बातचीत करायला मिळणं हा सुखद आश्चर्याचा धक्का होता.

महेश मांजरेकरांनी सलमानला शिवानीचा परिचय करून देताना, ‘अँग्री यंग वुमन’ असा करून दिला. शिवानी सलमानला पाहून प्रचंड खूश झाली होती. तिला काय बोलायचे हे देखील कळत नव्हते आणि त्यामुळेच सलमान खानला शोमध्ये आलेलं पाहून शिवानीने महेश मांजरेकर यांना प्रश्नही विचारला की, “सर, हे स्वप्न आहे की सत्य हेच मला समजत नाहीये.” 

शिवानीने हा प्रश्न विचारल्यानंतर सलमाननेही तिची चांगलीच थट्टा-मस्करी केली. सलमानने तिला एक सल्ला देखील दिला. तो म्हणाला, “हो, मी सलमानचा डुप्लिकेट आहे. खरं तर, मी तुला माझ्या एका फिल्ममध्ये घेणार होतो. पण तू बिग बॉसच्या घरात आहेस. तुला जर फिल्म करायची असेल, तर एक पर्याय आहे. कोणाच्या तरी कानाखाली मार... नियमांचं उल्लंघन कर... म्हणजे बिग बॉसच्या घरातून तुला आपोआप बाहेर काढले जाईल.”

शिवानीवर असलेला सलमानचा फिव्हर बिग बॉसच्या या भागात सगळ्यांनाच पाहायला मिळाला. तिने यावेळी तिच्या भूतकाळातील अनेक आठवणींना उजाळा दिला. तिने सांगितले की, “मी पूर्वी सलमान खानच्या घराखाली जाऊन अनेकदा ‘जिद ना करो... जरा समझा करो’ हे गाणं नेहमी गायचे.”

यावेळी शिवानीने सलमानसमोर त्याच्याच मुझसे शादी करोगे या सिनेमातलं ‘जिने के है चार दिन’ या गाण्यावर डान्स करून सलमानची वाहवा मिळवली.


Web Title: Bigg Boss Marathi 2 : Salman Khan give this advise to Shivani Surve
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.