Bigg Boss Marathi 2: Neha Shitole punishes Abhijeet Bichukale | Bigg Boss Marathi 2 : बिचुकलेंना मिळाली पाण्यात उभं राहण्याची शिक्षा, हे आहे त्यामागचं कारण
Bigg Boss Marathi 2 : बिचुकलेंना मिळाली पाण्यात उभं राहण्याची शिक्षा, हे आहे त्यामागचं कारण

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये नियमांचे उल्लंघन करण्यास सक्त मनाई आहे आणि तसे जर कोणत्या सदस्याने केले तर तो सदस्य शिक्षेस पात्र असतो. अभिजीत बिचुकले बर्‍याचदा या घराच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. आज अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा नियम मोडताना दिसणार आहेत.

बिग बॉसच्या घरामध्ये दिवसा झोपण्यास सक्त मनाई आहे आणि तसे केल्यास कोंबडा आरवतो हे माहिती असताना देखील बिचुकलेंनी तो नियम पुन्हा मोडला. शिवानीचे म्हणणे पडले आता त्यांना आतमध्ये म्हणजेच अडगळीच्या खोलीमध्ये टाका. तर नेहा म्हणाली मी त्यांना कालच सांगितले आहे आता मी पाण्यात उभे करणार आहे. नेहा आज अभिजीत बिचुकले यांना स्वीमिंग पूलमध्ये उभे रहाण्याची शिक्षा देणार आहे.


अभिजीत बिचुकलेंचे त्यातही म्हणणे आहे पूर्ण उभा नाही राहू शकत तर नेहा देखील पाण्यात उतरली. नेहाचे म्हणणे पडले तुमची उंची माझ्यापेक्षा जास्त आहे पूर्ण पाण्यात उभे रहा, नेहाने सदस्यांना त्यांच्याशी बोलण्यास मनाई केली. शिक्षेमध्ये देखील बिचुकले काही ना काही मजेशीर मुद्दा शोधतात आणि घरातल्यांचे मनोरंजन करतात.


बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल कॅप्टनसीसाठी उमेदवार निवडण्याचे बिग बॉस यांनी सदस्यांवर कार्य सोपावले होते.  या कार्यात सदस्यांमध्ये बरेच वाद विवाद झाले, मतभेद, भांडण झाली  आणि अखेर या आठवड्याच्या कॅप्टनसीसाठी दोन उमेदवार मिळाले. या आठवड्यामध्ये “म्हातारीचा बूट” हे कॅप्टनसी कार्य शिव आणि किशोरी शहाणे मध्ये रंगणार आहे.

 आता हा टास्क सदस्य कसा पार पाडतील आणि घराचा कॅप्टन होण्याचा मान कोण पटकावणार हे बघणे उत्सुकतेचे असणार आहे.


Web Title: Bigg Boss Marathi 2: Neha Shitole punishes Abhijeet Bichukale
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.